थेंब पावसाचा..

दिपक सुमन पंडित साटोटे  
Saturday, 20 July 2019

नव्या सुगंधाने दरवळतो
हा काळ पावसाचा ,
स्वप्नं हिरवेगार करतो
साधा उद्देश थेंबाचा ||

नव्या सुगंधाने दरवळतो
हा काळ पावसाचा ,
स्वप्नं हिरवेगार करतो
साधा उद्देश थेंबाचा ||

वीज झळकते आकाशी
आस लागते पावसाची,
पाखरे घरट्यात बसती
काया बरसणाऱ्या थेंबाची ||

सोसाट्याचा वारा वाहतो
धारा लागती पावसाच्या,
टीप टीप आवाज घुमतो
जागोजागी निथळ थेंबाच्या ||

वनात नाचतो मोर 
ही रंगीन रीत निसर्गाची ,
पानांच्या थेंबातील सुरांन
खुशी द्विगुणिते प्राण्यांची ||

रिमझिमणाऱ्या पावसात
मेघ ही दाटून कोसळले,
टप टपणाऱ्या थेंबानी
गावोगावी तळे साचले ||

नदी तळाला पूर येतो
मारा जोरदार पावसाचा,
प्रलय भयंकर आणतो
प्रकोप एक एका थेंबाचा ||

बिजातून कोम फुटतो
नभाशी विजय मातीचा,
साऱ्यांना आनंद देतो
असा एक थेंब पावसाचा ||

    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News