देशभरात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जेवणात तांदूळाचा भात हा प्रमुख पदार्थ असतो, भाताशिवाय अनेकांचे जेवन पुर्ण होत नाही. भातासोबत दही, मटन, चिकन, करी, दाल फ्राय असे वेगवेगळे पदार्थ मिसळून खाल्ले जातात. भात शिटवण्याचे विविध प्रकार आहेत, साधारन तांदळात पाणी घालून चवीनुसार मिठ मिसळले जाते आणि भात शिजवला जातो. काही वेळांनी भातावर पाणी जमा होतो त्याला काही भागात गंजी या नावाने ओळखले जातो. गंजी ही शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. लहानपणी पोट साफ होण्यासाठी मुलांना तांदळावरची गंजी दिली जायची, त्याचे अनेक फायदे होते. तांदळाच्या पाण्यात अमिनो ऍसिड, विटामिन, लोह आणि ऑंटीअक्सिडेंट इत्यादी घटक समाविष्ट आहे. त्यामुळे तांदळाचे पाणी शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. तांदळाचे पाणी शरीरासाठी कोणते फायदे देतात हे आम्ही सांगणार आहोत
पचन क्षमता वाढते
पाण्यात तांदूळ टाकून शिटपले जातात, मात्र तांदळात पाणी जास्त झाल्यामुळे अनेक वेळा ते पाणी काढुन फेकली जाते. या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात ते शरीराला विटामिन बी, सी आणि मिनरल्स पुरवतात. अनेक वेळा खाल्लेले अन्न जिरत नाही, शरीरात व्यवस्थित पचत नाही, तांदळाचे पाणी पचन क्रीया वाढवतो. आरोग्य तज्ञ सांगतात 'सोजी हे पारंपारिक पेय आहे. लहान मुलांना पिण्यासाठी दिले जाते. सोजीमध्ये पोषण तत्व आणि अन्न पचवण्याचे गुणधर्म असल्यामुळे शरीरात खाल्लेले अन्न पचवले जाते.
उर्जाशक्तीत वाढ आणि मुड चेंज
तांदळामध्ये कार्बोहाइड्रेट मोठ्या प्रमाणात असतात. तांदळाला उकळून सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. त्याचा फायदा मुड चेंज करण्यासाठी होतो. दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिवसाची सुरुवात तांदळाची गंजी पिऊन होते. उपवासाच्या वेळी एक ग्लास सोजी दक्षिणेतील नागरिक पितात.
हायड्रेटेड
उन्हाळ्यामध्ये शरिरात गर्मी निर्माण होते. या गर्मीपासून आराम मिळविण्यासाठी तांदळाच्या पाण्यात रिहायड्रेशन करण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे शरीराचे तापमान नैसर्गिक रित्या नियंत्रित राहते. शरीरात रिहायड्रेशन होत असल्यामुळे पाण्याची कमतरता सोजी भरून काढते. त्याचबरोबर उलटी आणि ताप अशा आजारांवर तांदळाचे पाणी रुग्णांना दिले जाते.
केसांसाठी उपयुक्त
दक्षिण पूर्व आशियामध्ये तांदळाच्या पाण्याचा उपयोग केसाला लावण्यासाठी केला जातो. पारंपारिक पद्धतीने तांदळाचे पाणी केसाला लावले जाते. त्यामुळे केस मजबूत आणि लांब होतात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तांदळाचे पाणी केसांना लावल्यास केस चमकदार आणि सॉफ्ट होतात. त्याचबरोबर केसाची मजबुती वाढते आणि लांब होण्यासाठी ताकद मिळते.
हेल्दी आणि कोमल त्वचा
दिवसभर काम करुन त्वचा रखरख होते, त्वेचेवर पुरळ येतात आणि त्वचेला उतरती कळा लागते. सोजी थंड करुन त्वचेवर लावली तर तात्काळ आराम मिळतो. तांदळावर आलेले गरम पाणी फ्रीजमध्ये ठेवा, थोड्या वेळाने त्याचा बर्फ होईल. हा बर्फ बाहेर काढून त्वचेवर हलका हलका लावल्यामुळे त्वचा कोमल आणि हेल्दी बनलते. बर्फामध्ये पोषणतत्व असता, चेहऱ्यावर लावल्यामुळे नसा मोकळ्या होतात. त्याचबरोबर विटामिन ए, सी, के, खनिजे, अँटिबायोटिक अशा प्रकारच्या गुणधर्मामुळे त्वचा चमकदार बनवते.