आरसा

अनुजा पाटील
Sunday, 25 October 2020

माझ्या या अशा अवस्थेकडे बघून ..
त्या आरश्यालाही त्याच्या खरेपणावर शंका आली..

खूप दिवसांनी आज भेट होणार होती..
रोजच्या पेक्षा आज जास्तच स्वतःला न्याहाळत होते..
दहा वेळा आरश्यात बघून केस सावरले असावेत...
माझ्या या अशा अवस्थेकडे बघून ..
त्या आरश्यालाही त्याच्या खरेपणावर शंका आली..
इतकं सजून सवरून सुद्धा .. अजून काही राहिलं का??
या माझ्या प्रश्नाला कंटाळून शेवटी आरसाच म्हणाला..
अग वेडे... एवढं सजण्याची गरजच काय?
 त्याला भेटण्याची  आतुरता , ती हुरहूर..
या सगळ्यांनीच तुझा चेहरा अगदी खुलून आलाय..
मनातल्या भावनांनी उमटलेला ..
तुझ्या चेहऱ्यावरचा तो प्रेममयी साजशृंगार म्हणजे..
जणू श्रीकृष्णाला दर्पणात शोधणारं ते राधेचेचं प्रतिबिंब..

- अनुजा पाटील

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News