गगनभरारी स्वप्नांची !

लक्ष्मण जगताप, बारामती
Friday, 8 November 2019

ध्येय निश्चित झाल्यावर त्या दिशेने प्रयत्न करावे लागतात. ध्येयाच्या वाटेवरुन  चालताना  अपयशाचे खाचखळगे लागतात. पण मनात जिद्द असेल तर ही खाचखळग्यांची वाटही सहज ओलांडली जाते. आणि यशाच्या अंतिम टप्प्यावर जाता येते.

स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज असते. त्याबरोबर मनगटात कष्ट करण्याची ताकद असेल तर यशस्वी होता येते. मनापासून घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याशिवाय राहत नाही. यशाची चव चाखायची असल्यास मेहनतीला पर्याय नाही.ध्येय निश्चित झाल्यावर त्या दिशेने प्रयत्न करावे लागतात. ध्येयाच्या वाटेवरुन  चालताना  अपयशाचे खाचखळगे लागतात. पण मनात जिद्द असेल तर ही खाचखळग्यांची वाटही सहज ओलांडली जाते. आणि यशाच्या अंतिम टप्प्यावर जाता येते. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल मनाची सकारात्मकता आपल्याला यशाकडे घेऊन जाते.

तो दहावीत असतानाच वडीलांचे छञ हरपले.घरात एक बहिण, आईने धीर न सोडता घरोघरी धुणीभांडी आणि केटरर्सचे काम सुरू केले. त्यानेही आपल्या मातेचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपड सुरु केली. दहावीमध्ये मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या जोरावर मुंबई गोवंडीमधील आयटीआयला इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश घेतला. तिथेही या ट्रेड मध्ये प्रथम क्रमांक मिळवून माटुंग्यातील व्हिजेटीआय महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिकसच्या दुसऱ्या वर्षाच्या डिप्लोमाला थेट प्रवेश मिळविला. तिथेही त्याने विशेष श्रेणी प्राप्त केली. व्हिजेटीआय मध्ये शिकत असतानाच त्याला सर्व्हिस इंजिनियरची नोकरी चालून आली. ती नोकरी करत असताना त्याने इस्ञोमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहिले. परीक्षेचा अभ्यास सुरु झाला. त्या बरोबरच सुरु झाली अखंड मेहनत तब्बल पंधरा हजार मुलांमधून तो सोळावा आला. आणि अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्ञो' मध्ये त्याची निवड झाली. सध्या तो तिथे तंञज्ञ म्हणून काम करीत आहे. तो ध्येयवेडा तरुण आहे. मुंबईतील गोवंडीचा राहुल घोडके. घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या एका मातेच्या कष्टाचे झालेले चीज यापेक्षा वेगळे काय असू शकेल. 

हार्दिक उप्रेती असे त्या बुद्धिमान बालकाचे नाव. खेळण्या बागडण्याच्या वयात त्याने केलेली कामगिरी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. 'ख्रिसमस मिरॅकल ' नावाची ५९ पानांची इंग्रजी कादंबरी या चिमुरड्याने लिहिली आहे. आणि दिल्ली मधील ब्लू रोज प्रकाशन या संस्थेने ती प्रकाशित केली आहे. इतक्या लहान वयात या मुलाने रचलेला हा इतिहासच आहे. वडील एका कंपनीत मॅनेजर आणि आई गृहिणी. बीजीएस इंटरनॅशनल स्कूल दिल्ली येथे इयत्ता सहावीच्या वर्गात सध्या तो शिकत आहे .

राहुल असेल किंवा चिमुरडा हार्दिक हे आजच्या बुद्धिमान पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यातच नव्हे तर आपल्या घरातील आणि आजूबाजूच्या अनेक मुलांच्याच नैसर्गिक अशा सुप्त गुणांचा व बुद्धिमत्तेचा खजिना दडला आहे. त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. अशा मुलांचे आत्मबल जागृत करून त्यांचा स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या कामी वाटाड्या म्हणून आपल्याला झोकून द्यावे लागेल. त्यांच्यातील सुप्तशक्तीला प्रेरित करण्याची जबाबदारी पार पाडताना नवी ऊर्जा देण्याचे कामही आपल्याला करायचे आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News