स्वप्न बळीराजाच..! 

डॉ. विनय वसंतराव दांदळे, अकोला 
Saturday, 27 July 2019

वैशाख वणव्याने आक्रंदणारी माती 
मृग रोहिणीच्या आगमनाने 
सुखावून जाते ...

वैशाख वणव्याने आक्रंदणारी माती 
मृग रोहिणीच्या आगमनाने 
सुखावून जाते...
सुखावलेली माती न्हाती धुती झाली की, 
मग आषाढातील पाऊस 
तिला चिंब चिंब भिजवून जातो,
तिच्या कस्तुरीसम सुगंधाने 
बळीराजाही चिंब होतो आनंदात, 
पोटापाण्यासाठी पोटालाच ओटी बांधतो, 
या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत 
त्याच्या जिद्दीलाही सलाम असतो,
त्या सलामातून उगवते, भरारते 
हिर्वेगार पीकपाणी 
दिसते त्यालाही कष्टाच्या घामातून 
डौलात फुललेले मोती, 
हसत ... हसत ... 
डोलणाऱ्या 
पिकांच्या तालावर 
आपल्या उज्वल भविष्याच्या स्वप्नात 
रमून जातो ..! 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News