गरीब घरातील ऋतुजाच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला मिळाले बळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020

पण ऋतुजाच्या स्वप्नांना आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बळ दिले आहे. डॉ. कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

गरीब घरातील ऋतुजाच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला मिळाले बळ

महाराष्ट्र - बुध्दीमत्तेच्या जोरावर आपण कोणत्याही परीक्षेत यश मिळवतो, पण अडचण असते ती अर्थिक परिस्थितीची कारण अनेकांची स्वप्नं अर्थिक अडचणीमुळे शक्य झालेली नाही. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आमलेवाडी बोतार्डेच्या ऋतुजा प्रकाश आमले या विद्यार्थीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.६० गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. परंतु घरच्या गरीबीमुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न पुर्ण होईल की अशी शंका ऋतुजाला होती. पण ऋतुजाच्या स्वप्नांना आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बळ दिले आहे. डॉ. कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच ऋतुजाला ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी  डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने अॅण्ड्रॉईड मोबाईलही तिला भेट देण्यात आला. वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीची दखल घेऊन तातडीने ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत अशाप्रकारे संवेदनशीलपणे काम करणारा खासदार लोकप्रतिनिधी लाभला याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.

ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते ही कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, अशी भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News