'हे' नाट्यगृह टाकणार कात 

यिनबझ ऑनलाईन टीम
Saturday, 23 February 2019

कला व मनोरंजन क्षेत्रात वाशीतील सुपरिचीत महापालिकेचा विष्णूदास भावे नाट्यगृहाचे लवकरच नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याकरीता तब्बल 8 महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच भावे नाट्यगृह बंद राहणार आहे. सृष्टी एंटरप्रायझेस तर्फे सुमारे 12 कोटी रूपये खर्च करून नाट्यगृहाअंतर्गत महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई : वाशी सेक्‍टर 16 ए येथे सिडकोने हे नाट्यगृह 1992 उभारण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर 1996 ला नाट्यगृह सिडकोकडून हस्तांतर करण्यात आले. तेव्हा पासून आत्ता पर्यंत 23 वर्षांत एवढ्या मोठ्या स्वरूपात नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे अजाही नाट्यगृहातील आसनव्यवस्था, रंगमंच, वातानुकुलित यंत्रणा, पडदा व्यवस्था, खोल्यांची व्यवस्था सर्व जून्या पद्धतीचे आहे.

नाट्यगृहाचे अद्ययावत पद्धतीचे नुतनीकरण व्हावे याकरीता मे. सोपान प्रभु यांच्याकडून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार नुतनीकरणात स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच प्रेक्षकांना अधिक चांगल्या पद्धतीने आवाज ऐकता यावा याकरीता ऍकॉस्टिक विषयक कामे करण्यात येणार आहे.

नाट्यगृहात नवीन खुर्च्या बसवणे, नाट्यगृहातील सर्व खोल्या व कर्यालयाचे नुतनीकरण करणे, नाट्यगृहाच्या लॉबी क्षेत्राचे विकास करणे, अग्निशमन यंत्रणा बसवणे, पार्किंगमध्ये बदल करणे, सरंक्षक भितींची सुधारणा करणे तसेच नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये अपंग व्यक्तींकरीता अडथळे मूक्त प्रवेश तयार करणे आदी कामांचा नुतनीकरणाच्या कामांमध्ये समावेश आहे.

तसेच विद्युत विषयक कामांमध्ये नाट्यगृहात अत्याधुनिक पद्धतीचे साऊंड सिस्टीम व लाईटची व्यवस्था करणे, सभागृहात नवीन वातानुकुलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच काही भाग हा सौर उर्जेवर चालवता यावा याकरीता सोलार यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच नाट्यगृहात चांगल्या दर्जाचे संगिताचा प्रेक्षकांना लाभ घेता यावा याकरीता अंतरराष्ट्रीय दर्जाची आवाजाची यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

विद्युत विषयक व स्थापत्य विषयक कामांसाठी 4 कोटी 48 लाख रूपये व 8 कोटी 30 लाख रूपये असे एकूण 12 कोटी 79 लाख रूपयांचा अंदाजे खर्चाची निवीदा पालिकेके काढली होती. यात सृष्टी एंटरप्रायजेस यांनी सादर केलेल्या निवीदेला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेतर्फे 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे लवकर नाट्यगृहाच्या कामाला सुरूवात होणार असल्याने नाट्यगृह बंद करण्यात येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News