नाटकाच्या पडद्यामागील नायकांचा सन्मान 

जागृती बोरसे
Wednesday, 27 February 2019

रंगमंचावर चमचमते तारे रसिकांची मने आकर्षित करत असतात. या ताऱ्यामागे तटस्थपणे उभ्या असलेल्या नाट्य व्यवस्थापकांचा सन्मान नागपूरला झालेल्या नाट्यसंमेलनात करण्यात आला. त्यात धुळ्यातील दोघा व्यवस्थापकांचा समावेश आहे.

नागपूर नाट्यसंमेलन : धुळ्यातील दोघा व्यवस्थापकांचा समावेश 

धुळे : नुकतेच 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नागपूरला झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची दर्जेदार मेजवानी अनुभवायला मिळाली. नाटय क्षेत्रातील विविध पुरस्कार व सन्मानही या संमेलनात पार पडले.

प्रथमच या संमेलनात नाटय व्यवस्थापकाचे विशेष सन्मान करण्यात आले. धुळ्यातील नाट्यपरिषदेचे नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील यांनी ही कल्पना मांडली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मराठी रंगभूमीवर नाटक बोर्डावर लावून ते तिकीट रूपातून प्रेक्षकांपर्यंत पोचवत प्रेक्षकांची पावले थिएटरकडे वळवणाऱ्या आणि खरे तर नाटक आर्थिक बाजूने जगवणाऱ्या प्रामाणिक नाटयव्यवस्थापकांचा या नाट्यसंमेलनात विशेष सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान केला गेला. 

धुळ्यातील उत्कृष्ट नाटयव्यवस्थापन आणि तिकीट विक्री व्यवस्थापनाबद्दल ओम्‌कार ईव्हेंन्ट्‌ व आर. एल. मल्टीसर्व्हीस या नाट्यसंस्थेचे प्रमुख राहुल बागूल व राकेश वाणी या दोघांचा नागपूरला 99 व्या नाट्यसंमेलनात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, 99 अ.भा.नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान झाला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, प्रेमानंद गज्वी लिखित "नाटक" हे पुस्तक तसेच पाच हजार रुपयाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

या विशेष सन्माना बद्दल नाट्यपरिषदेचे अध्यक्ष सुनील नेरकर, माजी अध्यक्ष अनिल चव्हाण, नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील यांनी कौतुक केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News