डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची कोविड रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

अजिंक्य मेटकर
Saturday, 11 July 2020

डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टुडिएस अँड रिसर्च, नागपुर एम.बी.ए च्या विद्यार्थ्यांनी मदत करण्याकरीता संचारबंदी दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनकडुन स्वइच्छेने ऑनलाईन स्वरूपात फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणुन तब्बल २१,००० रूपये जमा  करण्यात आले.

कोरोनाच्या या महामारीच्या संकटात संपूर्ण विश्व अडकलेले असून समाजातील प्रत्येक वर्ग आपापल्या परीने ज्या स्वरूपात शक्य होईल त्या स्वरुपात मदत करतो आहे. याच गोष्टीचा आदर्श घेऊन डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टुडिएस अँड रिसर्च, नागपुर एम.बी.ए च्या विद्यार्थ्यांनी मदत करण्याकरीता संचारबंदी दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनकडुन स्वइच्छेने ऑनलाईन स्वरूपात फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणुन तब्बल २१,००० रूपये जमा  करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींनी सदर २१,००० रुपयांचा धनादेश गरिमा फौंडेशन, अमरावतीच्या साहाय्याने दिनांक ०४ जुलै रोजी मा. अॅड यशोमतीताई ठाकुर (महिला आणि बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहायता निधि कोविड-१९ मध्ये जमा केला. यावेळी DAIMSR, नागपुर चे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अजिंक्य मेटकर, आकाश आडे उपस्थित होते. वरील निधी गोळा करण्याकरिता सारंग वानखडे, नीरज चाफले, भाग्यश्री दामले, सोनल बनसोड, पूर्वा पंतावने, निशा गोसावी, रोहित बैसवारे, गंगेश गुप्ता, योगेश खोजरे, निशांत उबरहांडे, अंजली माधवानी, साक्षी खोबरगडे, स्मृति कटवाले, स्वाति भिंगरे, भूषण उमाळे, आकाश आडे आणि मृगांक अंबुलकर यांनी देखील अथक परिश्रम घेतले आहेत.

 

 

                

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News