प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी डॉ रघुनाथ माशेलकर यांनी दिला अनोखा कानमंत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

पिंपरी : ‘‘टॅलेंट, टेक्‍नॉलॉजी अँड ट्रस्ट हे तीन ‘टी’ अर्थात हुशारी, तंत्रज्ञान आणि विश्‍वास देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे देश बळकट होईल,’’ असा संदेश आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी तरुणाईला दिला.

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेतर्फे चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टरमध्ये आयोजित ‘आंतरराष्ट्रीय पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर’ उपक्रमाचे उद्‌घाटन माशेलकर यांच्या हस्ते शुक्रवारी  झाले. 

महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

डीसीएफ व्हेंचर हे या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमामध्ये कौशल्यविकास, स्टार्टअप कार्यक्रमातील ‘सिटिझन हॅकेथॉन’, ‘स्टार्टअप पिचफेस्ट’, ‘स्पीकर सीरिज’, ‘स्टार्टअप शोकेस’ या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रांत काम करणारे उद्योजक सहभागी झाले असून, स्टार्टअप उद्योगातील व्यावसायिकांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन भरविले आहे. त्याचे व ‘हॅकेथॉन’चे उद्‌घाटनही माशेलकर यांच्या 
हस्ते झाले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News