परिवर्तन चळवळीचे 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवा  पुरस्कार' जाहीर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020
  • १५ मार्चच्या अधिवेशनात होणार प्रदान 

उल्हासनगर : "परिवर्तन;एक लोक चळवळी"चे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवा पुरस्कार जाहीर झाले असून ते उल्हासनगर येथे देविका लोखंडे हॉलवर रविवार १५ मार्चला होत असलेल्या १० व्या  वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. बहुजन समाजातील २५ बहुगुणी समाजरत्नांचा  यामध्ये गौरव होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म सेवा पुरस्कार कृतीशील आंबेडकर अनुयायी महेंद्र बारसागडे, बौद्ध साहित्यिक डी.एल .कांबळे, भारतीय बौद्ध समाजच्या अध्यक्षा व प्रवचनकार वसुंधरा मधाळे  व शांतीदूत बुद्ध विहार अध्यक्ष रामराव खाडे यांना जाहीर झाले आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यसेवा पुरस्कार गीतकार, साहित्यिक विजयकुमार गवई, नाटककार डी.डी.वाघमारे, कवयत्रि, कादंबरीकार विद्या भोरजारे, कवी भाष्यकार लक्ष्मण अभंगे बंधू, कवी कथाकार राजू रणवीर यांना जाहीर झाले आहेत. गेली अनेक वर्षे असंघटित कामगार यांच्यासाठी कार्य करणा-या सत्यशोधक कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर तायडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय सेवा पुरस्कारासाठी से.नि.अतिरिक्त जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे व से.नि.सहसचिव मंत्रालय मुंबई आय.एम .मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा पुरस्कार प्रख्यात बालरोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ.चंद्रकांत साळवे, अंनिसच्या उपाध्यक्षा पद्मा पाटोळे, अधिवक्ता, कवी लेखक अँड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते, विद्रोही कवी विजय गरुड, पृथ्वी संस्था उपाध्यक्ष संदिप लांडगे, सांची महिला मंडळ अध्यक्षा शारदा आंभोरे, भीम फाऊंडेशनचे अध्यक्ष विश्व नाथ नालगौडा, ऐश्वर्या महिला फाऊंडेशन अध्यक्षा रमा भालेराव, सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुरेश सोनावणे, प्रसंग मागासवर्गीय संस्था अध्यक्ष डॉ.गजपाल इंगोले, से.नि.समाजकल्याण अधिकारी मनोहर तायडे, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव व लहुजी संघर्ष सेना अध्यक्ष सुरेश बहिलम या मान्यवरांना जाहीर झाल्याचे परिवर्तन ;एक लोक चळवळीचे संयोजक राजकुमार सुर्वे यांनी कळविले आहे . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News