खर्डी जीवनदीप महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिन संपन्न

दिव्येश जाधव, ठाणे
Saturday, 7 December 2019

खर्डी जीवनदीप महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण निमित्त आदरांजली वाहण्यात आली

खर्डी: जीवनदीप कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण निमित्त महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून लाभलेले वाडा महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. दिलीप तेलंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली.

यात त्यांनी नदी जोड प्रकल्पाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, उर्जा निर्माण करण्याबाबत त्यांची भूमिका, शेतकरी, शेतमजूर, कामगार याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा सविस्तर परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. याप्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य के. आर. कळकटे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेची माहिती व महत्त्व सांगितले.

तसचे जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे सदस्य प्रशांत घोडविंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय या निमित्ताने विद्यार्थ्यांना करून दिला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोमनाथ नवले सरांनी केले व सूत्रसंचालन प्रा. रेश्मा घोडविंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News