मासिक पाळीमधल्या शंका आणि निरसन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 September 2019

स्त्रियांनी वर्षातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणीकरून घ्यावी. असे अनेक मानसशास्त्र डॉक्टरांचे मत आहे.

आजच्या आधुनिक युगात मुलगा आणि मुलगी हे भेदभाव होत नसले तरी स्त्रियांच्या काही बाबतीत अजूनही थोडे दुर्लक्ष झालेले आपणास दिसून येते. आजची मासिक पाळी म्हंटले की सगळ्यांना त्या विषयी बोलण्याचे धाडस होत नाही.

साधारण वयाच्या १३ ते १४ व्या वर्षी मुलींना पाळी येण्यास सुरुवात होते आणि त्या नटखट वयाच्या मुलीचे एका घाबरलेल्या गोंधळलेल्या आणि अचानक मोठे झाल्यासारखं जीवन होऊन जाते. मात्र लग्नानंतर काय बदल होतात. त्यासाठी महिलांनी काय सावधानता बाळगावी हे लक्षात घेणं जास्त गरजेचे आहे. 

स्त्रियांनी वर्षातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणीकरून घ्यावी. असे अनेक मानसशास्त्र डॉक्टरांचे मत आहे. वैवाहिक जीवनातलत्या अनेक दबलेल्या आणि अचानक रित्या बदलेल्या बदलामुळे त्याच्या मासिक पाळीमध्ये बदल घडून येतात. बरेच वेळा पोटात दुखले जाते. कधी कधी जास्त रक्तस्त्राव होतो कधी आहे त्या कालावधीत हा स्त्राव कमी होतो. त्यामुळे पुढील भावी आयुष्यात ह्याचा त्रास गंभीर रित्या होतो. त्यासाठी वेळो वेळी चेकअप करणे महत्वाचे आहे. 

मानसशास्त्रज्ञ सांगतात की, काही शारीरिक हार्मोनल बदलांचा तर काही मानसिक तणावाने शारीरिक बदल घडतात आणि त्याचा परिणाम ह्या मासिकपाळीवर होतो काही तक्रारी नैसर्गिक, तर काही व्यक्तिगत असतात. अशावेळी तक्रारींची यादी करीत बसण्यापेक्षा व्यक्तिगत उपचारांची नितांत गरज असते. ती म्हणजे एका समजुदार सखीची. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News