वंशाला मुलगा पाहिजे म्हणून स्त्रियांना कमी लेखू नका ?

रसिका जाधव
Friday, 14 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • सुशिक्षित असतात त्यांच कुटुंबात वंशाला दिवा पाहिजे असतो, त्यांना मुलगी म्हणजे दुसऱ्याच धन वाटतं.
  • पण हे चुकीचे आहे, मुली सुध्दा मुलांपेक्षा काही कमी नाहीत तरी का वंशाला दिवा पाहिजे.

मुंबई :- सुशिक्षित असतात त्यांच कुटुंबात वंशाला दिवा पाहिजे असतो, त्यांना मुलगी म्हणजे दुसऱ्याच धन वाटतं. पण हे चुकीचे आहे, मुली सुध्दा मुलांपेक्षा काही कमी नाहीत तरी का वंशाला दिवा पाहिजे. आज मुली देखील सर्व क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने काम करत आहे. आताच्या स्त्री सुध्दा घर संसार संभाळतात आणि नोकरी देखील करतात. मग तरी सुध्दा मुलगाच का पाहिजे. मुलगी नसेल तर वंशाला दिवा येणार नाही हे का त्यांना कळत नाही. त्या घरातील सूनेला मुलगा पाहिजे म्हणून छळ करणारी तिची सासू आणि नंद असते ती सुध्दा एकच स्त्रीच आहेना मग तरी त्यांना एका स्त्रीच मन कळत का नाही. या यांच्या अशा बूऱ्सटलेल्या विचारामुळे अनेक स्त्रीचे संसार मोडले. याच कारणामुळे अनेक लोक गुप्त गर्भतपासणी करतात आणि मुलगी असेल तर गर्भपात करतात. या सर्व गोष्टी लज्जास्पद आहेत. मुलगा हा जरी वंशाचा दिवा असेल तर, मुलगी घराची पणती असते आणि तिच पणती अनेक घरात प्रकाश देते हे का लोकांना दिसत नाही. सुशिक्षित म्हणारेच आज वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलींना कमी लेखतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?  याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

स्वतःला सुशिक्षित म्हणणारे देखील मुलींना फक्त कमी लेखत नाही तर 'ती'  जन्माला येण्याआधीच तिची हत्या देखील करतात. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला महत्वाचे स्थान दिले जात. आजही आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीमाता, विद्येसाठी सरस्वती, संकटमुक्तीसाठी दुर्गेची उपासना करतो परंतु या सर्व आदिशक्तींची पुजा करताना मात्र आपला भारतीय समाज नवीन जन्माला येणाऱ्या स्त्रीचं अस्तित्व नाकारतो आहे. असं का? तिने जन्म घेण्या अगोदरच तिला देवाघरी पाठविले जाते.

अनेक सुशिक्षित माणसे देवीच्या मंदिरात जाऊन 'मुलगाच होऊ दे' असा नवस मागतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की ते स्त्री शक्ती समोरच स्त्रीचं अस्तित्व नाकारतात. आधीची पिढी ही जास्त प्रमाणात शिकलेली नव्हती. पण सध्याची पिढी सुशिक्षित असून सुद्धा मुलगाच होण्याचा अट्टाहास धरतात. या सगळ्याचा विचार केल्यावर आपण खरंच एकविसाव्या शतकात आहोत का? असा प्रश्न पडतो.

आजच्या जगाने वैज्ञानिक दृष्ट्याही खूप प्रगती केली आहे. त्यामुळे सोनोग्राफी द्वारे लगेच मुलगा आहे की, मुलगी समजले जाते. आणि 'ती' जर मुलगी असेल तर 'न' पाहिलेल्या जगाचा तिला तिचा काही दोष नसताना देखील निरोप घ्यावा लागतो.

आजच्या एकविसाव्या शतकात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि ती स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करत असते. पण असे असतानाही कित्येक वेळेस नवजात अर्भके कचरापेटीत जिवीत अथवा मृत अवस्थेत आढळलेली आहेत आणि बऱ्याच वेळेस ते स्त्री अर्भक असते.

स्त्री भ्रूण हत्येचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मुलीच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च, आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे लग्नात तिला द्यावा लागणारा हुंडा. मग त्यामुळे तिने जन्माला यायचंच नाही का? 'पहिली मुलगी धनाची पेटी' 'मुलगी शिकली प्रगती झाली' 'बेटी बचाव बेटी पढाव' हे श्लोगण फक्त बोलण्यापूर्तीच राहिले आहेत असं म्हणण्यात काही वाद नाही.

श्रद्धा ठोंबरे

वंशाला दिवा हवा असावा आजही समाजात दुर्दैवाने असल्याचे पाहायला मिळते. मुलगा काय मुलगी काय मुलगा काय एक समान, बेटी बचाव चा नारा देऊन समाजात स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्याची मोठी मोहीम शासनाने हाती घेतली असतांना दुसरीकडे मात्र अजूनही ‘मुलगी’ समाजाला नकोशी का झाली आहे हे उत्तर मिळत नाही...

आज जर आपण पाहिले तर काही हॉस्पिटलमध्ये जेव्हा घरातल्या एका व्यक्तीला सांगितले की, तुम्हाला मुलगी झाली आहे, तर काही जणांच्या चेहऱ्यावर १२ वाजलेले दिसतात तर काही जण तर बोलतात आम्हाला मुलगी नको त्या बदलली मुलगा द्या... (आदली - बद्दल करा) असे आज काल सरास मोठं - मोठ्या दवाखान्यात होत.

काही सुशिक्षित मोठे माणस ज्याच्या कडे खुप पैसा अश्यानाच मुलगा हवा असतो आपण जर पाहिले तर कळेल की, काही गावच्या ठिकाणी जर मुलाची संख्या कमी आणि मुलींची संख्या जास्त प्रमाणत बघायला मिळेल. त्या गावामध्ये वेगवेगळे मुलीसाठी राबवले जातात. आज ही चाळीमध्ये राहणारे व्यक्ती ही मुलगा-मुलगी एक समान माणले जाते. ज्या घरात मुलगी असते त्या घरात लक्ष्मी असते असे बोलेल जाते पण हे खर आहे.

ज्यांच्या घरात कमी शिकलेले आसतात त्या घरामध्ये काही ही झालं तरी कोणत्या प्रकारचा भेदभाव होत नाही पण ज्या घरात सुशिक्षित व्यक्ती असती त्या घरात भेदभाव हा केला जातो मुलगा आहे की, मुलगी आहे हे जन्माच्या आधीच बघितलं जात काही जण देवा कडे मागणं करतात की मला मुलगा होऊ दे म्हणजे एक प्रकारे देवाला सुद्धा लालज देतात....

महेश सोरटे

आजच्या २१ व्या शतकातील सुशिक्षित लोक मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करतात हीच मोठी निर्लज्जस्पद गोष्ट आहे. जर आजचा माणूस सुशिक्षित असूनही मुला मुलीत भेदभाव करत असेल तर तो सुशिक्षित होऊन काय उपयोगाचे आहे. त्याच्या उच्च शिक्षणाचा काय उपयोग आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी ही मुलाच्या बरोबरीने काम करीत आहे,  तसेच ती प्रत्येक ठिकाणी,  प्रत्येक कार्यात पुढे सुद्धा आहे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे. तर मुलगी सुद्धा त्या वंशाची पणती आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलगी ही दोन घरांचे नाव रोशन करते,  तिच्याच गर्भातून तुमच्या घराची पिढी घडत असते. आपण जिच्या कडून वंशाचा दिवा हवा असा हट्ट करतो,  ती सुद्धा एक मुलगीच असते, याचेही भान समाजाने ठेवले पाहिजे. प्रत्येकाला आई, बहीण, मावशी, काकू, आत्या पाहिजे असते मग मुलगी का नको.

काही चांगल्या घरांमध्ये तर मुलगी ही पूर्णपणेच नाकारली जाते. का तर मुलगी ही दुसऱ्याची धन असते. तिला शिकून जन्म देऊन काही उपयोग नसतो. मुख्य म्हणजे तर ती उद्या समाजात वावरताना तिच्याकडे चार लोक वाईट नजरेने पाहतात तेव्हा तीच्यामुळे अपमान सहन करावा लागतो. अशा एक ना अनेक कारणांमुळे मुलगी जन्माला येण्या अगोदरच तिला गर्भातच मारले जाते. पण त्या गर्भातल्या कळीच मागण एकदा सुद्धा ऐकले जात नाही.

अहो काय म्हणत असेल ती गर्भातली कळी

"खोडू नको कळी आई जगू दे ग मला

मुलगा हवा वंशाला मुलगी नको का ग तुला

आई मला की, नाही दादाच्या हाताला धरून धुडूधुडू पळायचं ग

पायात पैंजण घालून छुपछुम नाचायचं ग"

ती गर्भातली कळी काकुळतीने आईला बाबाला विनंती करत असते.

ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते त्या मुलीचा बाप राजा माणूस असतो. ज्या घरातील पहिलं आपत्य हे मुलगी असते, त्या घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंदाने उधाण आलेले असते.

आजच्या काळात मुलगी ही राष्ट्रपती पदावर जाऊन पोहचली आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई,  इंदिरा गांधी,  किरण बेदी,  सुनीता विल्यम्स या सुद्धा मुलीचे होत्या. यांना जन्म दिला म्हणून आज आपला भारत देश महाराष्ट्र घडला आहे. त्यामुळे आज सुद्धा मुलीला आनंदाने जन्माला घातले पाहिजे, तिचे कौतुक केले पाहिजे. कारण तिच्यात या पृथ्वीवचं संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. तीच्यातचं आहे उद्याची जिजाऊ, लक्ष्मीबाई, दुर्गा,काली, त्यामुळे मुलगा मुलगी भेदभाव न करता तिच्या जन्माचे स्वागत करा...

शिल्पा नरवडे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News