शाळा सुरू करण्याची घाई करू नये - नरेश पुगलिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020
  • कोरोनाच्या काळात शाळा प्रत्यक्ष केव्हा सुरू होईल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात ४ ऑगस्ट नंतर शाळा सुरू होतील असं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केल्याने पालक संभ्रमावस्थेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू कराव्यात.

कोरोनाच्या काळात शाळा प्रत्यक्ष केव्हा सुरू होईल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात ४ ऑगस्ट नंतर शाळा सुरू होतील असं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केल्याने पालक संभ्रमावस्थेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू कराव्यात. जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, तसेच शेतक-यांची अडवणूक करू नये असं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी स्पष्ट केले.

खासदार नरेश पुगलिया यांनी जिल्हाधिका-यांना पत्र दिले असून त्यामध्ये विचारपर्वूक निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कडक बंद पाळण्यात येत आहे. त्याचपध्दतीने चंद्रपूर जिल्ह्यात कडक पाळण्यात येत आहे. शेतक-यांची कामे त्यांना करू द्या. त्यांच्या कामात आडकाठी करू नये असंही नरेश पुगलिया यांनी स्पष्ट केलं.

मार्च महिन्यात होणा-या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या, तसेच विद्यार्थ्यांचे मार्क सुध्दा सरासरी गुणानुसार देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात शाळा सुरू होणार की नाही ही पालकांची आणि विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था वाढवणारी गोष्ट आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News