मग तुमच्या नेत्यांना तोंड आवरायला सांगा ; रोहित पवारांचे खडे बोल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020
  • देशभरातून ह्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.
  • महाराष्ट्रात या विषयामुळे प्रचंड असे राजकीय वातावरण तापले आहे."आज के शिवाजी नरेंद्र मोदी " या पुस्तकामुळे भारतीय जनता  पक्षाला देशभरातून प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित असलेल्या पुस्तकामध्ये केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्यामुळे हा विषय चांगलाच चिघळला आहे.

देशभरातून ह्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. महाराष्ट्रात या विषयामुळे प्रचंड असे राजकीय वातावरण तापले आहे."आज के शिवाजी नरेंद्र मोदी " या पुस्तकामुळे भारतीय पक्षाला देशभरातून प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले आहे.

या वादात आता कर्जत- जामखेड मतदार संघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे.रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.आमदार रोहित पवार यांनी या पुस्तकांचे भांडवल करणार्यांना चांगलेच सुनावले असून या विषयाचे राजकारण बंद करा अशा आशयाचे मत देखील व्यक्त केले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुस्तकाचे वितरण मागे घेत असल्याचे जाहीर केले. प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून हि माहिती दिली. नेमका ह्याच ट्विट ला रिट्विट करून रोहित पवार यांनी प्रकाश जावडेकरांना चिमटा काढलाय.

वादावर पडदा घालण्यापेक्षा वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. एवढ्या वादावर सारवासारव करण्यापेक्षा वाद निर्माणच होऊन द्यायला नको होता. तुमच्या नेत्यांनाही लगाम घाला असा सणसणीत टोला देखील रोहित पवार यांनी हाणला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News