अच्छे दिनाचं माहित नाही; पण देश पुढे गेला आहे

योगीराज मुंडे, परळी वै.
Saturday, 10 August 2019

काश्मीरमधून आज आमच्या 370 बाहेर नेला आहे
अच्छे दिनाचं माहित नाही; पण देश पुढे गेला आहे

काश्मीर मधून आज आमच्या 370 बाहेर नेला आहे
अच्छे दिनच माहित नाही पण देश पुढे गेला आहे

काश्मीर मधल्या देशभक्तांनी 370 केलीय होळी 
संपूर्ण देश साजरी करतोय देशात नवी दिवाळी 
आज भारताच संविधान काश्मिरात धडकणार 
काश्मीरच्या निगड्या छातीवर आपला तिरंगा फडकणार

काश्मीर मधला देशभक्त आनंदाने नाचतोय
आपल्याला आपसात लढवणारा आज बातम्या वाचतोय
370 धारा निघून आलेला वेळ आपलाय
स्वप्न बघनर्यांनो भारत मिटवण्याची तुमचा खेळ संपलाय

370 च्या आजाराचं 72 वर्षांनी निदान केलय 
72 वर्षांनी काश्मिरला आज स्वतंत्र्य दिलय
प्रत्येक खाडीत आज काश्मीरच्या जयहिंद आवाज घुमतोय 
खऱ्या अर्थाने भारत आज बळकट लोकसत्ता दिसतोय

कश्मीरच्या नदीनदीतून वाहतोय समानतेचा झरा 
घाटी मध्ये सुटलाय सुसाट स्वतंत्र्याचा वारा
शेजारचा देश आमच्या वेड्या सारखा भुकत आहे
दिल्लीच्या तख्तापुढं जग सारं झुकत आहे

आज पासून हक्काने कश्मीर आपलं झालं 
बर वाटलं वोट आपलं देशाच्या कामी आलं
देशात  वांदे असून त्यांच्या पाकिस्तान आपल्याला धमक्या देतोय
दाखवून देऊ त्यांना भारत जात मोडून एकत्र येतोय

15 लाख आले नाहीत खात्यात पण कश्मीर भारतात आलं
जवानांचं बलिदान आपल्या आज सार्थकी लागलं
देशामध्ये आजचा दिवस घराघरातून साजरा आहे
बलिदान दिल काश्मीर साठी त्या प्रत्येक देशभक्तास माझा मुजरा आहे...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News