घरी पडून असलेला मोबाईल विद्यार्थ्यांसाठी दान करा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

हा उपक्रम सुप्रिया सुळे यांना आवडला असून त्यांनी या उपक्रमाचं टविट्रवरती कौतुक केलं असून या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे. 

घरी पडून असलेला मोबाईल विद्यार्थ्यांसाठी दान करा 

पुणे - कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचं असल्याने राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरूवात केली. पण प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याचं साधन नसल्याने पुणे जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबिवला आहे. घरी पडून असलेले अँड्रॉईड मोबाईल दान करण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. यामध्ये शक्य असल्यास जुना अँड्रॉइड मोबाईल, टीव्ही, टॅब आणि कम्प्युटर सुध्दा दान करण्याचे आवाहन केले आहे. 

 

पुणे जिल्हा परिषद शाळेत दोन लाख ३२ हजाराच्या दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्यांकडे  ऑनलाइन शिक्षण घेण्यास पैसे नाहीत. एक लाख ३२ हजार विद्यार्थ्यांना मोबाईलवरती ऑनलाईन शिक्षण घेण शक्य आहे. तसेच एक लाख विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नाही. त्यामुळे हा उपक्रम राबिवल्याचे झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

ज्या विद्यार्थ्यांच्या घरी किंवा परिसरात नेटवर्क मिळत नाही, त्यांना वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 35 ग्रामपंचायत परिसरात नेटवर्क नसलेले हजार विद्यार्थी आहेत. यामध्ये भोर वेल्हा, आंबेगाव आणि जुन्नर या चार तालुक्यांचा समावेश आहे. या भागात भारत नेट डिपार्टमेंट ऑफ आयटी मार्फत इंटरनेट उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अॅप डाउनलोड करता येईल. त्यामुळे विद्यार्थी मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून प्रोफाईल तयार करू शकतो. एका वर्षाचा अभ्यासक्रम तीस आठवड्यात विभागून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. हा उपक्रम सुप्रिया सुळे यांना आवडला असून त्यांनी या उपक्रमाचं टविट्रवरती कौतुक केलं असून या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News