शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

कोरोनामुळे देशांची झालेली दैना अजून कमी होताना दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजूनही गंभीर होण्याची भीती व्यक्त केली. देशांनी आरोग्याची अधिक काळजी घेतली नाही, तर माहामारी गंभीर रूप घेईल असंही टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी सांगितले. 

शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका

चीनमध्ये सुरूवात केलेल्या कोरोनाने अवघ्या जगात लोकांच्या माध्यमातून संचार केला आहे. कोरोनाचा संसर्ग इतक्या झपाट्याने झाला आहे की, देशांची अर्थिक गणित कोलमडून गेली आहेत. तसेच लॉकडाउन असल्यामुळे काही देशात शाळा आणि महाविद्यालय कधी सुरू होतील हे निश्चित सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून काही देशांनी मागील महिन्यापासून ऑनलाइन शिक्षणाला सुरूवात केली आहे. मात्र काही देश प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. 

शाळांना राजकीय फुटबॉल समजू नका असा इशारा सुध्दा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, याबाबतच वृत्त रॉयटर्नसे दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी कोरोनाची परिस्थिती बिकट असताना इतक्यात शाळा सुरू करू नये असं आवाहनही केलं आहे. त्याचबरोबर एकदा कोरोनाचं संकट कमी झालं की शाळा सुरू करायला हरकत नाही असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी त्यांनी अमेरिकेत मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन करण्यात यावा असा सल्ला सुध्दा दिला आहे. यामुळे हाताबाहेर गेलेली परिस्थिती रोकण्याला यश येईल. 

कोरोनामुळे देशांची झालेली दैना अजून कमी होताना दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजूनही गंभीर होण्याची भीती व्यक्त केली. देशांनी आरोग्याची अधिक काळजी घेतली नाही, तर माहामारी गंभीर रूप घेईल असंही टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी सांगितले. 

१ कोटी ३२ लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली आहे.  साडे पाच लाखांच्या पुढे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आहे. अमेरिका आणि ब्राझिलला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News