भूमिपुत्रांना नोकरीसाठी डोमिसाइल महत्त्वाचं 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छूकांनी आपली माहिती पोर्टलमध्ये भरायची आहे, तसेच एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून तुम्हाला नोकरी संधी तिथे उपलब्ध होईल. 

महाराष्ट्र - कोरोनाच्या महाभयंकर काळात अधिक भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाजॉब्स पोर्टलचं नुकतचं उद्घाटन केलं. विशेष म्हणजे उध्दव ठाकरेंनी ऑनलाईन पध्दतीने हे उद्घाटन केलं आहे. उद्घाटन प्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे डोमिसाइल असल्याशिवाय नोकरी मिळणार नाही. 

डोमिसाइल आवश्यक केल्यामुळे भुमिपुत्रांनाच नोकरी मिळेल, तसेच कंपन्यानी आणि उद्योगांना याचा फायदा घेत भूमिपुत्रांना नोकरी द्यावी. ज्या तरूणांकडे कौशल्याची कमतरता आहे, अशा तरूणांना कौशल्य विकास विभागात जोडून घेतलं जाईल. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गरजू असलेल्या तरूणांना १०० टक्के नोकरी मिळणार तसेच त्यांना काही कालवधी पुरतं वापरण्यात येणार नसून कायमस्वरूपी नोकरी मिळेल, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. 

रोजगारासाठी १७ क्षेत्रे निवडण्यात आली आहेत, त्यातून ९५० हून अधिक व्यवसायाला चालना मिळेल. हे पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश हा आहे की, यातून प्रत्येकाला रोजगार मिळेल. कोणीही बेरोजगार राहणार नाही. विशेष म्हणजे नोकरी देणारे आणि मागणारे या दोघांनाही एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ५० हजारहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छूकांनी आपली माहिती पोर्टलमध्ये भरायची आहे, तसेच एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून तुम्हाला नोकरी संधी तिथे उपलब्ध होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News