कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन लागू ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

अनुदानित आणि नंतरच्या नियुक्त सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत लवकरच धोरण स्वीकारले जाईल,

मुंबई : अर्धवेळ १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित व अंशतः अनुदानित आणि नंतरच्या नियुक्त सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत लवकरच धोरण स्वीकारले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत श्रीमती गायकवाड यांनी विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोळंकी, संचालक दिनकर पाटील, आमदार विक्रम काळे, महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फासगे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, प्रा. अतुल पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रा. शिंदे यांनी झालेल्या चर्चेची माहिती देताना विविध मागण्या मांडल्याचे सांगितले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News