सुशांतच्या आत्महत्येत राजकीय हस्तक्षेप आहे,असे आपणास वाटते काय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

सुशांतच्या आत्महत्येत राजकीय हस्तक्षेप आहे,असे आपणास वाटते काय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सुशांतच्या आत्महत्येत राजकीय हस्तक्षेप आहे,असे आपणास वाटते काय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

अनेक दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आपण पाहतोय, प्रत्येक दिवशी नव्याने आत्महत्या प्रकरण वळण घेताना दिसतंय, सुशांतची गर्लफ्रेंड रियावरती पैशाची आफरातफर केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिस योग्य पध्दतीने तपास करीत नसल्याचे आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यातच बिहारचे काही वरिष्ठ पोलिस अधिकारी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआई मार्फेत व्हावा असं महाराष्ट्र विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना, सुशांतच्या आत्महत्येत राजकीय हस्तक्षेप आहे, असे आपणास वाटते काय ? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रुपमध्ये आज मनसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडत मतं आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

"कितने  अजीब  रिश्ते हे यहा पे"... हे बॉलिवूड विश्वाला सुटेबल असे गाणे आहे. म्हंटले  तर सगळेच सगळ्यांच्या ओळखीचे.. पण तरीही अनोळखी असल्यागत आहे. असो .. . सुशांत सिंग राजपूत हा हुशार आणि हुरहुन्नरी असा अभिनेता बॉलिवूड विश्वाला लाभला होता .. नुसता अभिनय नाही तर बाकीच्या बऱ्याच गोष्टींबद्दल त्याला माहिती होती .. अभिनय क्षेत्रात त्याने मेहनत देखील भरपूर घेतली .. नेपोटीझम च्या युगात आपल्या अभिनयाने हाती असलेल्या टॅलेंट ला प्रेक्षकांसमोर आणून बॉलिवूड मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे  हे खरंच कौतुकास्पद आहे .. आणि त्याचे पुरावे म्हणजे "काय पो छे ", "छिछोरे ","धोनी " सारखे चित्रपट .. एखाद्या व्यक्तीबद्दल जगासमोर अभिनयाद्वारे त्या व्यक्तीला हुबेहूब साकारणे, हे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही .. त्यासाठी लागणारी मेहनत हा प्रत्येक जण घेत असतो . आणि प्रत्येकालाच ते जमते असे नाही. एक अभिनेता म्हणून तो लोकांसमोर नेहमीच चांगला आणि एक स्ट्रगलर अभिनेता म्हणून राहिला.. मात्र वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी स्वतःचे आयुष्य संपवेल अशी कल्पना सुद्धा कोणी करू शकणार नाही...

काहीतरी चुकतेय ही आत्महत्या नाही असू शकत नाही. हे जेव्हा कळले तेव्हा पासूनच काहीतरी गडबड आहे हे जाणवत होते. आता CBI सुशांतच्या अचानक जाण्याचे खरे कारण काय असू शकेल ह्याचा शोध घेईल अशी आशा आहेच.. तरी ह्या सगळ्यात राजकारणी किती सहभागी आहेत  ह्याचा अंदाज आपण जरी लावला तरी सत्य हे सगळ्यांसमोर येईल तेव्हाच त्याचा उलगडा होईल असे वाटते. जर विचार केला तर दिव्या भारती, जिया खान, श्रीदेवी, इंदरकुमार ह्या कलाकारांचा  नक्की कशाने मृत्यू झाला ह्याचे गूढ अजून उकलेले नाही .. आणि जेव्हा सुशांत आत्महत्या बाबतीत संशय घेण्यात आला तेव्हा मात्र "नेपोटीझम किंवा बड्या कलाकारांमुळे  उभरत्या कलाकारांचे करियर संपुष्टात आले आणि त्या धाकाने म्हणा किंवा एका वेगळ्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली" असे सांगण्यात आले .. आणि प्रत्येक जण आता या विषयी  बोलत आहे...  मात्र एक विचार केला तर ह्या सगळ्यात राजकारण्यांचा वरदहस्त असल्यावरच अशी प्रकरणे दाबली जाऊ शकतात .. हे सर्वश्रुत आहे.

राजकारणी...  मग त्यात कोणाचा हात? कोण सहभागी ? ह्याचा उलगडा CBI ने जरी केला तरी स्वतःची मान, प्रतिष्ठा जपण्यासाठी ते लोकांसमोर उघड केले जाईल ह्याची मला शंका आहे ..त्यामुळे काही गोष्टींचा विचार ह्या विषयी ज्याने त्याने  केला तर राजकारणी हस्तक्षेप कितपत आहे हे ज्याचे त्यालाच कळेल ..  मात्र ह्या सगळ्यात आता तरी खरा न्याय सुशांतला मिळतो का हे पाहणे महत्वाचे ..

- हर्षदा पाटे

सध्या भारतात म्हणा की राज्यात सगळीकडेच कोरोना आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याच न्यूज दिसत आहेत. सुशांत सिंगने आत्महत्या केली पण त्याला वेगळेच वळण लागलेले आहे. मग त्यात त्या केसची चौकशी सीबीआयने करावी, की पोलिसांनी यावरच वाद चालू आहेत. खरंतर ज्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळी सरकार जेवढे त्यात लक्ष् घालत नव्हते. ते आता सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये घालत आहेत. परत पार्थ पवार यांनी यावर केलेले ट्विट यावरुन सुद्धा असच दिसते की राजकीय हस्तक्षेप आहे.  याचे नक्की कारण राजकिय पक्ष किंवा त्यातील नेतेमंडळींनाच माहीत. पण अशी पण शक्‍यता असू शकते की सध्या कोरोना सोडले तर सत्ताधारी पक्षांना लक्षीत करण्यासाठी दुसरा कोणताच विषय नाही मग याविषयावर बोलून त्यांना विरोध केला जाऊ शकतो असं ही असेल. पण सर्व परिस्थिती पाहता यामधे राजकिय हस्तक्षेप आहे हेच दिसत आहे.

- स्वाती शेषराव बडे (रूईया कॉलेज)

सुशांत सिंग राजपूत एक चांगला अभिनेता होता, मग त्याची आत्महत्या सगळ्यांनाच भावूक करणारी गोष्ट आहे. पण ज्या माणसाच्या तीन मैत्रिणी होत्या, एकी बरोबर तू लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होता. त्याच्याबद्दल इतके बोलले जाते ,परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल बोलले जात नाही. अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. त्याबद्दल बोलले जात नाही, आज जो मीडिया सुशांत सिंग राजपूत बद्दल बोलतो. त्या मीडियाचा वापर सुशांत सिंग राजपूतला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल करता आला नाही का ? हा प्रश्न उभा राहतो

- निसार नायकवडी (फौजी)

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या चौकशीकडे लक्ष दिलं तर समजतं की राजकीय वर्तुळात चांगलंच काहूर माजल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेच्या उदाहरणात हे समजून येतं. पोलीस चौकशी पासून सिबीआय चौकशी याबाबत असलेली राजकीय मागणी आणि नकार. यामधून असं दिसून येत, की या आत्महत्येमागे काहींना काही राजकीय धागेदोरे आहेत हे निश्चित...

- विनायक पाटिल (रूईया कॉलेज)

सुशांत सिंग राजपूत हा एक उत्कृष्ट अभिनेता होता, त्याच्या अशा अचानक आत्महत्येमुळे सर्वजण विचारात आहे, की नेमके काय काय कारण असावे. परंतु प्रसारमाध्यांद्वारे येणाऱ्या सर्व बातम्या, चर्चा आणि राजकीय वातावरण पाहता त्याच्या आत्महत्येशी माझ्या मते राजकारण तर सोडाच, बॉलीवूड मधील मोठ्या व्यक्ती, सीबीआय देखील सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- शेखर पाटील

सुशांतसिंग याने मानसिक त्रास या कारणामुळे आत्महत्या केली आहे. पण ही आत्महत्या आहे का ? का  घात यावर मागील काही दिवसापासून फालतू ची चर्चा चालू आहे. यात राजकारण खूप प्रकारे केल जात आहे. एकदा अभिनेता आत्महत्या का करतो याचा शोध सोडून या मध्ये राजकीय लोक आपल्या हात शेकत आहेत. कोरोनामुळे जग त्रासात आहे. भारतीय लोक हजारोंच्या संख्येने उपाशी मरत आहेत आणि यांची मदत कराची सोडून या विषयावर चर्चा चालु आहेत व काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगची प्रियसी अंकिता लोखंडे हिच्या घरचा हप्ता सुशांतसिंग च्या बँक अकाउंट मधून भरली जात होती, अशी बातमी माध्यमातून पसरवली जात होती. पण वास्तविक असं काही नाही अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर ती स्वता तिच्या घराचा हप्ता भरत आहे, असे पुरावे सर्वांना दाखवले आहेत. काही प्रमाणात मीडिया चुकत आहे केवळ सुशांतसिंगचा मुद्दा हा लोकांना असला की सर्व लोक लगेच पाहतात. ह्या कारणमुळे यासंदर्भात बातम्या पसवल्या जात आहे. अगोदर सलमान खान, करण जोहर, महेश भट यांच्यावर आरोप लावले जात होते. पण या बाबतीत त्यांना आरोपी ठरवतील असे पुरावे समोर आले नाहीत, तसेच  हे आरोपी आहेत का ? नाही हा एक वादाचा मुद्दा आहे

.- विजयकुमार कटारे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News