आज 'जागतिक काळा दिवस' म्हणजेच 'हिरोशिमा दिवस' का म्हणतात माहित आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

6 ऑगस्ट 1945 हा जगाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी आणि काळा दिवस माणला जातो. या दिवशी मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून सार्‍या जगाला हादरून सोडलं होतं. त्यावेळेला बॉम्बचा प्रभाव इतका मोठा होता की, तीन लाख वस्तीचे हिरोशिमा शहर एका क्षणात बेचिराख झाले होते. 

या दुर्दैवी घटनेला आज 74 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने या घटनेबद्दल काही खास...

‘लि‍टल बॉय’ आणि कृरता - तब्बल 4 हजार किलो वजन, 3 मीटर लांबी आणि 71 सेंटीमीटर व्यास असलेल्या अनुबाँबने हा पराक्रम गाजवला होता. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप म्हणजेच अ‍ॅटोमिक बॉम्ब होता. हिरोशिमा शहरात तो बाँब पडताच तब्बल 2 हजार फूट उंचावर त्या स्फोटाची दाहकता जाणवून आली होती. या स्फोटामध्ये शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट झाला होता. 

त्या दिवशी झालेला स्फोट हा इतका गंभीर स्वरुपाचा होता की, दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे पहिल्या दिवशीच दगावले होते. त्यानंतर मात्र भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अपुरा आहार, अपुऱ्या सोईसुविधा यांमुळे दगावले होते.

या घडनेनंतर जपानने स्वत:मध्ये खूप बदल करून घेतले आणि जगाला एक शिकवण दिली की, नुकसान करण्याची ताकद सगळ्याच देशाकडे आहे मात्र त्या नुकसानातून बाहेर येण्याची ताकद फक्त जपानकडेच आहे. 

जाणून घ्या, कोणत्या देशांकडे किती अण्वस्त्र 
रशिया : 6800 अण्वस्त्र
अमेरिका : 6600 अण्वस्त्र
फ्रान्स : 300 अण्वस्त्र
चीन : 270 अण्वस्त्र
ब्रिटन : 215 अण्वस्त्र
पाकिस्तान : 130-140 अण्वस्त्र
भारत : 120-130 अण्वस्त्र
इस्रायल : 80 अण्वस्त्र
उत्तर कोरिया : 10-20 अण्वस्त्र

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News