'बाळूमामा' च्या नावान चांगभलं सिरीयल मधला खलनायक 'काळभैरी'चा प्रवास तुम्हाला माहीत आहे का ? 

महेश घोलप
Sunday, 1 March 2020

2014 च्या नंतरचा बराच मोठा काळ संघर्ष करण्यात गेला. विशेष म्हणजे वडिलांनी आतापर्यंत अर्थिकबाबी सगळ्या संभाळून घेतल्यामुळे तो मुंबईत राहू शकला. प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देऊन  त्याला ताजेतवाने ठेवण्यात त्याच्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे. त्याने आत्तापर्यंत 19 सिरियल केल्या त्यापैकी काही सिरीमधली त्याची भूमिका ब-याच लोकांना आवडल्याचं तो सांगतो...

चित्रपट क्षेत्रात यश-अपयश या गोष्टी घडतचं असतात, पण गावाला असताना डोक्यात घुसलेलं वेड पुर्ण करण्यासाठी आलेला तरूण त्यांच्या उंबट्यावर पोहचल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळूमामा सिरियल मधला काळभैरी...काळभैरीची भूमिका साकारणारा तरूण अभिनयातून लोकांच्या मनात घर करतौ...आत्तापर्यंत त्याने 19 मराठी आणि हिंदी सिरियल अभिनेता म्हणून केल्या, त्यामध्ये त्याला पुसटसं कामं मिळालं. पण त्यामध्ये त्याला चमक दाखवता आली नाही. पण मिळाळेल्या कामातून त्याने महाराष्ट्रातल्या अधिक लोकांपर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळतं आहे. 

27 मार्च ला जागतिक रंगभूमी च्या दिवशी औरंगाबादमध्ये १९८५ साली जन्म झालेल्या या तरूणाचं नाव इंद्रसिंह राजपूत वडिल रतनसिंग ठाकरे ( राजपूत )औरंगाबाद मधील यशवंत कला महाविद्यालयात असल्याने 'इंद्रसिंह'च  बालपण औरंगाबाद मध्ये गेले. घरात मोठा असल्याने इंद्रसिंह अधिकतर मनाप्रमाणेचं वागायचा... त्याच्या प्राथमिक शिक्षणासाठी औरंगाबादच्या ज्ञानप्रकाश विद्यामंदीर शाळेत प्रवेश घेतला होता. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याला अंर्तभूत विविध कला अंगात असल्याचे जाणवायला लागले. त्यानूसार तो शाळेत तशी कृत्ये सुध्दा करू लागला. 

७ वीला असताना इंद्रसिंह हलगी वाजवणे, गाणे गाणे आणि वर्गात कॉमेडी करू लागला. वारंवार वर्गात नकला करत असल्याने ही बातमी सरांच्या कानावरती गेली. सरांनी त्यावेळी इंद्रसिंह प्रोत्साहन दिले. सुभाष मेहेर, कैसाल वहुले आणि मुख्याध्यापक एस. पी जवळकर यांनी त्याला प्रोत्साहन दिल्याने त्याचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि त्याने कॉमेडी खूप सिरियस घेतली. 

२००० साली इंद्रसिंह वर्गात कॉमेडी करतोय, हे पाहून सरांनी त्याला अहमदनगरला बालनाट्य स्पर्धेत जबरदस्तीने पाठवलं. त्यावेळी डॉ. कांकरिया यांची बलनाट्या स्पर्धा सुरू होती. त्या स्पर्धेत धनंजय सर देशपांडे लिखित आणि रमाकांत मुळे दिग्दर्शित " रोपण खडडा ओपन या बालनाटकातून अभिनय प्रवास सुरु केला दहावीपर्यंत कोणत्या क्षेत्रात जायचं हे फिक्स नव्हतं आणि घरच्यांकडून हेचं कर अशी काही अपेक्षाही नव्हती. त्यामुळं इंद्रसिंह ११ सायन्सला अॅडमीशन घेतलं. तिथं काय होणार याची कधी कल्पना सुध्दा त्याने केली नव्हती. त्या दरम्यान १२ वीला तीनवेळा इंद्रसिंह नापास झालो. त्यामुळं तेथील काही मित्रांच्या संपर्कात येऊन तो वाम मार्गाला लागला. पण बारावी नापास होऊनही बाबांनी मला बाईक घेऊन दिली हे मात्र विशेष होतं. 

दरम्यानच्या काळात अनेक जणांच्या भेटीगाठी होत गेल्या, त्यावेळी नाटकातला एक मित्र भेटला त्याने इंद्रसिंहला तू काम करशील का ? पटकन होकार दिला. आपलं मन त्याने कला क्षेत्राकडे वळवलं. अथक प्रयत्नानंतर अखेर १२ वीच्या परिक्षेत इंद्रसिंह ला यश आलं. आपल्याला ते खूप अवघड जातंय हे कळल्यानंतर त्याने सरळ रस्ता बदलला आणि बीएला अॅडमीशन घेतलं. ब-याच वर्षांचा खंड पडल्यामुळे त्याने नाटकाकडे अधिक फोकसं केलं. तेव्हा भूकंप नावाचं नाटक त्याला मिळाला. राज्य नाट्य स्पर्धेसाठी तेव्हा ते नाटकं सादर करायचं होतं. रात्रभर जागरण करून नाटकाची तयारी त्यांचा ग्रुप करत होता. इतकी थंडी पडली होती की, रात्रीचा त्यांनी एक बॅंच जाळला होता. यात प्रा विनय हतोले, प्रा रमेश ढोंडगे,प्रा सुनील बनकर यानी मार्गदर्शन केले

पदवी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर, इंद्रसिंह ने कशाचीही परवा न करता जीवाची मुंबई गाठली. एका मित्राच्या सांगण्यावरून मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर जवळचा मित्र विनोद पाटील याच्याकडे राहायला गेला. तिथे एका रूम मधील किचन फक्त त्यांना भाड्याने देण्यात आला होता. त्या किचनमध्ये फक्त दोन माणसांना झोपण्याएव्हढी जागा होती. साधारण सहा महिन्यानंतर त्यांच्या मराठी इंडस्ट्री मधील काही लोकांशी तोंड ओळखी झाल्या. अचानक मालकाने घर खाली करायला सांगितलं. कारण, विचारल्यानंतर मुलाचं लग्न ठरल्याचं सांगितलं. त्यावेळी इंद्सिंहला एक नाटक मिळालं होतं. तो त्या नाटकामुळे मुंबई सोडायला तयार नव्हता. राहायची व्यवस्था होत नसल्याने त्याने दादर स्थानकात चार दिवस मुक्काम केला. 

चतुर असलेल्या इंद्रसिंह ने मुंबई विद्यापीठात लोक कला अकादमी मधे  प्रवेश मिळवला. तिथं शिक्षण सुरू आहे, तोपर्यंत राहायची व्यवस्था झाली. अभ्यास करत असताना त्याने नाट्य क्षेत्रातलं काम सुरूचं ठेवलं.यात डॉ गणेश चन्दनशिवे, डॉ प्रकाश खांडगे यांच्यकडूंन मोलाचे मार्गदर्शन मिळाले, पथनाट्य आणि रोड शो केल्याचा अर्थिक लाभ मिळायचा. त्यामुळे जिथे शो असायचे तिथे तो पोहोचायचो....अभ्यासक्रम संपल्यानंतर  काळ ओळखी करण्यात गेला....अजूनही बरेच काही शिकायचे ही उमेद असल्याने, राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली येथून शास्रोक्त प्रशिक्षण घेतलेले" दिलीप पावले" यांच्यकडून अभिनयाचे वैयक्तिक प्रशिक्षण घेतले आणि दिलीप पावले यांचा गुरू म्हणून स्वीकार केला पन त्यांचा सहवास जास्त वेळ मिळू शकला नाही 2014 ला त्यांचे निधन झाले

2014 च्या नंतरचा बराच मोठा काळ संघर्ष करण्यात गेला. विशेष म्हणजे वडिलांनी आतापर्यंत अर्थिकबाबी सगळ्या संभाळून घेतल्यामुळे तो मुंबईत राहू शकला. प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देऊन  त्याला ताजेतवाने ठेवण्यात त्याच्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे. त्याने आत्तापर्यंत 19 सिरियल केल्या त्यापैकी काही सिरीमधली त्याची भूमिका ब-याच लोकांना आवडल्याचं तो सांगतो...

ईदच्या दिवशी प्रशांत पाटील नावाच्या कार्यकारी निर्माता मित्राचा त्याला कॉल आला. त्याने समोरून विचारलं की तु अशी भूमिका करू शकतो का ? ते करायचं मनात पक्कं केलं. कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं असं त्या सिरियलं नाव होतं. त्या तो करत असलेली भूमिका म्हणजे काळभैरव...ही भूमिका महाराष्ट्रातल्या अधिक लोकांच्या पसंतीला उतरल्याने...काळभैरी नावाच्या व्यक्तीरेखेला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. आणि आज बघता बघता बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले, यासाठी इंद्रसिंह निर्माता संतोष अयाचित, दर्शना अयाचित, दिग्दर्शक निशांत विलास सुर्वे, रूपेश टितकारी, संदीप विश्वासराव, प्रेम धांडे, बाबा केंद्रे, प्रवीण चंदनशिवे, प्रशांत पाटिल, यांचे मनापासून आभार मानतो, तसेच पुढील वर्षी इंद्रसिंह राजपूतचे 3 मराठी चित्रपट प्रदर्शित होतील....

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News