'खारघर हिल्स'बद्दल या गोष्टी जाणून घ्या 

कृष्णा डी ठोंबरे (यिनबझ)
Wednesday, 1 May 2019

पर्यटकांचे शहर म्हणून मुंबई ओळखली जाते. मात्र नवी मुंबईत देखील अशी पर्यटनस्थळ आहेत, ज्याठिकाणी तुम्ही मनसोक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकता. 

पर्यटकांचे शहर म्हणून मुंबई ओळखली जाते. मात्र नवी मुंबईत देखील अशी पर्यटनस्थळ आहेत, ज्याठिकाणी तुम्ही मनसोक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकता. 

आज आपण पाहूया एक अशा ठिकाणची माहिती जी सध्या पर्यटक स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध होत आहे. 'खारघर हिल्स' हे नवी मुंबईतील ठिकाण अतिशय निसर्गसौंदर्याने नटलेलं आहे.

फार कमी लोकांना माहित माहित असल्याने याठिकाणी कमी वर्दळ पाहायला मिळते. वाहणारे झरे आणि हिरवागार परिसर असल्याने  थंड हवेचे ठिकाण म्हणून हे मानलं जात. जवळच पांडवकडा असल्याने याठिकाणी अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी आणि  सहलीसाठी येत असतात.

तुम्हीसुद्धा इथे एकदा भेट द्याच; इथे तुम्ही कारने, बाईकने किंवा प्रभातफेरीसाठी सुद्धा जाऊ शकता. आताच्या या उष्णतेच्या वातावरणात एखाद्या शनिवारी, रविवारी इथे जाऊन थंड हवेचा आनंद घ्या. या टेकड्या नवी मुंबईपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर असून याची देखरेख सिडको करत आहे.

इथे एक सुंदर तळ सुद्धा आहे जिथे तुम्ही रात्री कॅम्प फायर सुद्धा करू शकता आणि गप्पा गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. पावसाळ्यात तर याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं.

चहुबाजूनी डोंगर आणि खळखळणारे पाण्याचे झरे.. एक दिवसीय पिकनिक प्लॅन करत असाल तर याठिकाणी नक्की भेट द्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News