कार्तिक-कियाराची 'ही' गोष्ट तुम्हाला माहित आहे का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दोघांणी कधीही एकत्र चित्रपटामध्ये काम केलेलं नाही. आता त्यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे...
 

मुंबई :  ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या हिंदी चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारल्या. अभिनेत्री कियारा अडवाणीने ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘कबीर सिंग’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले. आता कार्तिक आणि कियारा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे.

‘भूल भुलैया २’ या चित्रपटात हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिश बाझमी करणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री कशी असणार हे पाहणं औत्सुक्‍याचे ठरणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News