डाळिंबाचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020
  • प्रत्येकजण आवडीने डाळिंब खात असतो. पण त्याचे नेमके फायदे काय आहेत? याबद्दल आपल्याला फारसं माहित नसतं. डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आपण आपल्या दैनंदिन आहारात कोणत्या न कोणत्या फळाचा वापर करत असतो. आपण खात असलेलं प्रत्येक फळ हे शरीरासाठी फायदेशीर असतं. अशाच एका फळाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. प्रत्येकजण आवडीने डाळिंब खात असतो. पण त्याचे नेमके फायदे काय आहेत? याबद्दल आपल्याला फारसं माहित नसतं. डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पुरुषांना डाळिंबाचा एक विशेष फायदा आहे, तो म्हणजे डाळिंबामुळे पुरुषांमधील सेक्स हार्मोन्सचे प्रमाण वाढण्यास मदत होते. डाळिंबामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स पुरुषांमधील टेस्टेस्टेरॉन हार्मोन्स वाढवतात यामुळे शुक्राणूंची संख्या वाढून विर्याच्या पातळीमध्येदेखील वाढ होते. त्यामुळेच पुरुषांनी आठवड्यातून किमान एकदा तरी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खायला पाहिजे. किंवा डाळिंबाचा ज्यूस करूनदेखील पिता येतो.

बायबलमध्ये डाळिंबाचा उल्लेख केला असून डाळिंबाला निरोगी आणि दिर्घायुष्याचं प्रतीक मानलं आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांसाठी डाळिंब हे अधिक फायदेशीर आहे. फास्ट फूडचा जमाना असल्याने प्रत्येक जण पिझ्झा बर्गर यांसारखे पदार्थ खाताना दिसत आहेत. परंतु या फास्ट फूडमुळे मुख्यत्वे स्त्रियांना गर्भधारणेत समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी डाळिंब हे उपयोगी पडू शकतं. डाळिंबामध्ये असणारं फॉलिक ऍसिड हे स्त्रियांना गर्भधारणेच्या अडचणींपासून दूर ठेवतं, आणि याचा फायदा गर्भवती स्त्रियांना बाळाच्या विकासाठी होऊ शकतो. 

त्याचप्रमाणे हृदयाचे विकार असणाऱ्या डाळिंब फायदेशीर ठरतं.  डाळिंबामुळे शरीरातील  कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. डाळिंब रक्तवाढीसाठी उपयुक्त असून शरीरातील कमजोरी दूर करते. डाळिंबात असणारे फायबर्स पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात तसेच त्वचेच्या अनेक समस्या डाळिंबाने दूर होतात. त्यामुळे अशा या जास्तीत जास्त फायदेशीर असणाऱ्या डाळिंबाचे सेवन आठवड्यातून एकदा तरी केले पाहिजे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News