खरबूजाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020

खरबूजाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

खरबूजाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

महाराष्ट्र - आपलं आरोग्य चांगलं रहावं यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो. विशेष म्हणजे पालेभाज्यांपासून ते फळांपर्यंत अनेकजण आहार घेण्याचा प्रयत्न करीत असतात. घेत असलेल्या आहारातून रोजच्यारोज गुणधर्म शरिराला मिळाल्याने शरीर सदृड राहतं. त्यामुळे अनेकवेळा तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टर तुम्हाला फळ खाण्याचा सल्ला देतात. परंतु या फळाव्यतिरिक्त खरबूज फळ तितकचं गुणकारी आहे.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण उन्हाळ्यात इतर शीतपेय घेत असतो. परंतु खरबूज खाल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. तसेच शरीरातलं संतुलन राखण्यासाठी अनेकजण खरबूज खातात.

फायदे

  • खरबूज फळामध्ये शीत गुणधर्म आहेत, ज्यांना उष्णतेचे विकार होतात अशांनी खरबूज खावं
  • उन्हाळ्यात खरबूज खाल्याने शरीराला थंडावा मिळतो.
  • खरबूज सेवनाने आतड्यातील घट्ट मळ पुढे सरकण्यास मदत होते.
  • अतिसार, आमांश या विकाराच्या लोकांनी खरबूज खावे
  • खरबूज खाल्याने शरीरातील पाण्याची क्षमता वाढते.
  • खरबूज खाल्याने पचनक्रिया सुधारते
  •  वजन वाढविण्यास मदत होते.
  •  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News