रविवारचा जनता कर्फ्यू तुम्हाला माहित आहे का ? मग वाचा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020

करोनाग्रस्त लोकांची सेवा रूग्णालयात करत असलेल्या व्यक्तींप्रती कृतज्ञता म्हणून २२ मार्चसा सायंकाळी ५ च्या दरम्यान आपल्या घरी घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी असे मोदी म्हणाले. 

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी नुकतेच भारतीय जनतेला विविध माध्यमातून आवाहन केले. की २२ मार्चला रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहेर न पडता, जनता कर्फ्यूचे पालन करावे, ही आपल्या देशाची खूप मोठी परीक्षा आहे. करोना व्हायरस विरोधात लढण्यात आपण कितपत तयार आहोत हे या कर्फ्यूतून स्पष्ट होईल. 

देशभरात थैमान घातलेल्या करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वातोपरी पर्यंत्न करीत असल्याचे आपण पाहतोय. रूग्णालयात आणि विमानतळावर काही कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. 

करोनाग्रस्त लोकांची सेवा रूग्णालयात करत असलेल्या व्यक्तींप्रती कृतज्ञता म्हणून २२ मार्चसा सायंकाळी ५ च्या दरम्यान आपल्या घरी घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी असे मोदी म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News