नाशिकच्या इंद्रगडाची अशी माहिती आहे का तूमच्याकडे ?

रसिका जाधव (यिनबझ)
Saturday, 13 April 2019

महाराष्ट्राच्या नकाशात नाशिक जिल्याहातील किल्ल्याची एकूण संख्या ६० च्या घरात पोहोचते. यातील अंजिठा- सातमाळच्या डोगररांगेतला देवाधिदेव इंद्राचे नाव धारण करणारा हा इंद्राई ऊर्फ इंद्रगड.

दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या कुशीत सेलबारी- डोलबारी आणि या रंगाना सरळ छेद देणाऱ्या सातमाळा, त्र्यंबक, पेठ, कळसुबाई, चणकापूर या डोगररांगावर नाशिक जिल्याहातील किल्ल्याचं वैभव पसरलेलं आहे.

महाराष्ट्राच्या नकाशात नाशिक जिल्याहातील किल्ल्याची एकूण संख्या ६० च्या घरात पोहोचते. यातील अंजिठा- सातमाळच्या डोगररांगेतला देवाधिदेव इंद्राचे नाव धारण करणारा हा इंद्राई ऊर्फ इंद्रगड. त्यांची समुद्रसपाटीपासून उंची १३७१ मीटर असून, हा गिरीदुर्ग मुंबई- आग्रा महामार्गावर नाशिकपासून ७२ किलोमीटर अंतरावरील चांदवडपासून १२ किलोमीटर आहे. त्यावर वडुबारे किंवा राजदेहेरेवाडी या पायथ्याच्या गावाकडून चढाई करता येते. 

राजदेहेरवाडीजवळील डोंगर मार्गाने आपण सरळ इंद्राई किल्ल्याकडे कूच करू शकतो. वर दिसणाऱ्या कड्याच्या डावीकडून वळसा घालून  आपण डोगंराच्या खोदीत पायऱ्यांजवळ येऊन पोहोचतो. इथं एक पाण्याचे असून, गुहा किंवा लेणी अर्धवट कोरलेल्या दिसतात. आपण पुढे -पुढे जाताना फार्सी भाषेतील शिलालेख नजरेस पडतो. पण, त्याचा अर्थबोध काही होत नाही.

पायऱ्या संपल्यावर आपण एका पठारावर येऊन विसावतो. पठाराच्या डाव्या अंगास काही भग्न जोती लक्षात येतात. इथेही आपणास लेणीवजा गुहा पाहावयास मिळतात. गुहांच्या समोरच टोकाला अजस्त्र कडा आणि खोल अशी दरी लक्ष वेधून घेते.

पठारावरून आणखी वर चढून गेल्यास दगडी खांब असलेलं आणि पाषाणात कोरलेलं शिवमंदिर दृष्टीस पडते. आत शंकराची पिंड असून, गाभारा प्रशस्त आहे. या परिसरातच एक तलाव असून, काही इमारतींचे जोती दिसून येतात.

 गडाच्या माथ्यावरून चांदवडच्या राजदेहेर किल्ल्यासह आणखी बरेच किल्ले आपणास खुणावताना दिसतात. किल्ल्यावर मुक्कामासाठी गुहांचा उपयोग होऊ शकतो. किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक महिती मिळत नाही. तरीही खानदेशच्या वाटेवर असलेला हा किल्ला तत्कालीन टेहळणीसाठी उपयुक्त असावा, असे दिसते.

            

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News