तुम्हाला कोथिंबीरीचे 'हे' फायदे माहित आहेत का?

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Friday, 22 March 2019

कोथिंबिरीचं शास्त्रीय नाव ‘कोरिअँड्रम सॅटिव्हम’ असं आहे. इंग्रजीत ‘कोरिअँडर’ आणि हिंदीत ‘धनिया’ असं म्हणतात.  विविध पदार्थांप्रमाणेच रोजच्या भाज्या आणि डाळी यांचा स्वाद वाढवण्यासाठी हिचा वापर केला जातो. कोथिंबिरीची वाळलेली फळे म्हणजे धणे. धण्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. 

  •  अँटिसेप्टिक गुण असल्यामुळे त्वचाविकारांवर  अतिशय गुणकारी ठरते. 
  •  उचकी, दाह, कावीळ, पित्त आदी गोष्टींवर गुणकारी ठरते. 
  •  ॲलर्जीवरही अतिशय गुणकारी आहे. 
  •  पचनासाठी चांगली असते. 
  •  रोज आहारात समावेश केल्यामुळे मधुमेहाची समस्या कमी होते. 
  •  कर्करोगापासूनही बचाव होतो. 
  •  कोथिंबिरीत लोह, मॅगनीज असतात, जे शरीराला आवश्‍यक असतात. 
  •  लोह असल्यामुळे धणे आणि कोथिंबिरीचा वापर नियमित केल्यास केसांच्या वाढीसाठीदेखील उत्तम आहे. 
  •  अनियमित मासिक पाळी असलेल्यांनी धण्याचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
  •  निद्रानाशावरही गुणकारी ठरते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News