सीमला मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

सीमला मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

सीमला मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

महाराष्ट्र - शरीराला चांगलं खाणं, तसेच चांगलं आरोग्य राखण्यासाठी नेहमी तत्पर असतात. पण ब-याचदा आपण पालेभाज्या किंवा मिरची आले खाण्याचे टाळतो. पण तुमच्या नाआवडत्या भाज्यांचं महत्त्व तुम्हाला माहित आहे का ? विशेष म्हणजे मिरचीला भोपळी मिरची, सिमला मिरची आणि ढोबळी मिरची अशी नावं आहेत.

१)  ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे. अशा व्यक्तीनी आहारात सीमला मिरची घ्यावी. कारण या मिरचीत कमी कॅलरीज असतात, त्यामुळे ते पचायलाही सोप्पं असतं आणि त्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं.

२)  ज्या व्यक्तीला मधुमेहचा आजार आहे, अशा व्यक्तींनी सुध्दा आहारात सिमला मिरची घ्यावी त्याने साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.

३) अन्न अपचन झाल्यानंतर अनेकांना त्रास होतो. त्यांनी सिमला मिरची खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्याचबरोबर तुमचे पोटाचे विकार देखील बरे होतात.

४)  रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी असं प्रत्येकाला वाटतं असतं. त्यामुळे अनेकजण योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम करतात. पण सिमला मिरची खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुध्दा वाढते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News