महाराष्ट्रातलं महाबळेश्र्वर सारखं दुसरं ठिकाण तुम्हाला माहित आहे का ? मग वाचा...

महेश घोलप
Friday, 28 August 2020

महाराष्ट्रातलं महाबळेश्र्वर सारखं दुसरं ठिकाण तुम्हाला माहित आहे का ? मग वाचा...

महाराष्ट्रातलं महाबळेश्र्वर सारखं दुसरं ठिकाण तुम्हाला माहित आहे का ? मग वाचा...

सांगली - सातारा जिल्ह्यातील महाबळेश्र्वर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे, तिथं नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अनेक पर्यटक येतात. देशभरातून अनेक पर्यटक थंडीचा अनुभव घेण्यासाठी येतात. परंतु त्याचं पध्दतीचं पर्यटनाच्या दुष्टीने भटकंतीसाठी अनेकजण महाबळेश्र्वर समजून सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा तालुक्यातील गुडे-पाचगणीला भेट देतात. ऋतूनुसार तिथंल चित्र बदलतं असतं, तेचं पर्यटकांना आवडतं.

पावसाळ्यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक या स्थळला अधिक भेट देतात. कारण हे ठिकाण तिन्ही जिल्ह्याच्या सीमारेषेवरती आहे. तिथं काही वर्षापुर्वी पवनचक्की तिथं बसवण्यात आली. पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. हे यंत्र बसविल्यानंतर तिथं पर्यटकांचा लोढा वाढला तो अद्याप थांबलेला नाही. तिथं फक्त फिरण्यासाठी जाणा-यांची संख्या अधिक त्यामुळे त्या परिसरात अजून इतर सेवा नाहीत.

सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील पर्यटकांना ३२ शिराळा तालुक्यातल्या आरळा, करूंगली या ठिकाणाहूत तिथं जाण्यास रस्ता आहे. तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मेणी या गावातून तिथं जाण्यास रस्ता आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील पर्यटक तिथं पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे तिथं पावसाळ्यात प्रचंड धुकं पाहायला मिळतं. त्याचबरोबर हे ठिकाण उंचावरती असून तिथून तिन्ही जिल्ह्याचं दर्शन होतं. तसेच डोंगररागांचं सुध्द दर्शन पाहावयास मिळतं.

चांदोली धरण तिथून काही अंतरावरती असल्याने त्याचंही लांबून दर्शन होतं. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणी अनेकजण महाबळेश्र्वर असं संबोधतात.

मी साधारण १० किलोमीटरवरचा रहिवासी आहे, माझा स्वत: चा व्यवसाय असल्याने कामानिमित्त मी नेहमी त्या परिसरात जात असतो, त्यामुळे माझं मन नेहमी प्रसन्न राहतं - नामदेव कोठावळे

मी पावसाळ्यात तिथं मित्रांसोबत नेहमी फिरायला जातो. कारण पावसाळ्यात महाबळेश्र्वरची मज्जा गुडे-पाचगणी या ठिकाणी मिळते - शेखर पाटील

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News