इलेक्ट्रीक बाईक घेताय? 'या' गोष्टी नक्की तपासा

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Sunday, 20 September 2020

बहुतांश तरुणाईने इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यात पसंती दर्शवली. मात्र इलेक्ट्रीक बाईक खरेदी करताना कोणत्या गोष्टींची प्रकर्षाने चौकशी केली पाहीजे यांची कमतरता जाणवली. इलेक्ट्रीक बाईक विकत घेताना काही गोष्टी गाभीर्याने तपासाव्या लागतात, त्यामुळे बाईकला दिर्घायुष्य लाभू शकते, आणि ग्राहकांना समाधन मिळते. इलेक्ट्रीक बाईक खरेदी करण्यापुर्वी खालील गोष्टींची मुद्यांची चौकशी नक्की करावी. 

पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा अशा नैसर्गिक खनिज संपत्तीचा बेसुमार वापर सुरु आहे, त्यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. जगातील खनिज संपत्तीचे स्रोत दिवसेंदिवस संपत चालले आहेत, काही वर्षांनी खनिज तेलाची चणचण सर्वच देशांना जाणवणार आहे. खनिज तेलाला पर्याय आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी जगभर संशोधन सुरु आहे. जगभरातील वाहनांना सर्वांधिक इंधन लागते, त्यामुळे भविष्याची गरजा ओळखून विकसित देशांनी काही महत्त्वपूर्ण बदल केले. पेट्रोलऐवजी इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय निवडला. भारतातही आता इलेक्टीक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहक गांभीर्याने विचार करत आहेत. तरुण- तरुणी इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यास इच्छुक आहे का? या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली.

रायबरेली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी सुजाता शिंदे म्हणाली, 'जगभरात खनिज तेलाच्या बेसुमार वापरामुळे प्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे, प्रदुषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय उत्तम आहे. भविष्यात ईव्ही वाहन खरेदी करण्याचा विचार आहे, मात्र पेट्रोल पंपासारखे पॉवर स्टेशन भारतात उपलब्ध नसल्यामुळे लांबचा पल्ला गाठणे कठीण आहे.' 

आयटीआयचा विद्यार्थी कृष्णा गाडेकर म्हणाला की, सध्याचे युग हे विज्ञानाचे आहे. मनुष्याने विज्ञानात फार प्रगती केली. आणि प्रवास सुखकर करण्यासाठी अनेक वाहनांचा विकास झाला. याच विज्ञानाचा आविष्कार म्हणजे मोटरसायकल होय. पूर्वी बाजारात बीएस४ इंजिन प्रकारची मोटरसायकल होती. अधिक प्रदुषण करत असल्यामुळे शासनाने यावर बंदी घातली. त्या जागी बीएस६ इंजिनची मोटरसायकल बाजारात आणली. तरुणाईमध्ये नवनवीन मोटरसायकल घेण्याची क्रेज आहे. सध्याची मोटरसायकल पेट्रोलवर चालत असल्यामुळे प्रदूषण वाढत आहे. दुसरीकडे पेट्रोल महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाही. पर्याय म्हणून मोटरसायकल निर्मिती कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती केली. इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल ही विजेवर चालत असल्यामुळे वायू प्रदूषण होण्याचा कसलाही धोका नाही. इलेक्ट्रीक बाईक इतर बाईकच्या तुलनेत अगदी स्वस्त असून ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे.'

लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा विद्यार्थी अजय भालेराव म्हणाला की, 'सध्या मार्केटमधे इलेक्ट्रॉनिक मोटार सायकल आली आहे ती इको फ्रेंडली आहे, त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन मार्केटमध्ये आणून भारताने प्रगती केली. पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल आहे. इलेट्रीक वाहणाचा वापर सर्व लोकांसाठी होणार आहे'.

नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ता सूरज कांबळे म्हणाला की, 'इलेक्ट्रीक बाईक फायदेशीर आहेत. त्यामुळे प्रदूषण होणार नाही, पेट्रोलची बचत होईल, पण लांब ठिकाणी प्रवासाला जाताना जर चार्जिंग संपली तर अवघड होईल. अडकून बसावे लागेल. त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत, त्यामुळे बाईक ही इलेक्ट्रॉनिक् पण असावी आणि, पेट्रोलची पण असावी'. 

बहुतांश तरुणाईने इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यात पसंती दर्शवली. मात्र इलेक्ट्रीक बाईक खरेदी करताना कोणत्या गोष्टींची प्रकर्षाने चौकशी केली पाहीजे यांची कमतरता जाणवली. इलेक्ट्रीक बाईक विकत घेताना काही गोष्टी गाभीर्याने तपासाव्या लागतात, त्यामुळे बाईकला दिर्घायुष्य लाभू शकते, आणि ग्राहकांना समाधन मिळते. इलेक्ट्रीक बाईक खरेदी करण्यापुर्वी खालील गोष्टींची मुद्यांची चौकशी नक्की करावी. 

परवाना आणि नोंदणी:

पेट्रोल बाईक प्रमाणे इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी करणे, इन्शोरन्स काढणे आवश्यक नाही, तसेच वाहन चालकांना लायसन्सची आवश्यक नाही, हा नियम 250 व्हॅट सह स्लो- स्पीड असलेल्या इलेक्ट्रीक बाईकसाठी लागू आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना खर्चात कपात होईल. आणि ग्राहकांना त्यांचा फायदा निश्चित होईल. इलेक्ट्रीक बाईक घेताना या गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

बॅटरी:

इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांमध्ये दोन प्रकारच्या बॅटरी असतात. एक लीड अॅसिड बॅटरी आणि दुसरी लिथियम आयर्न बॅटरी. बॅटरीच्या क्षमतेप्रमाणे गाडीची किंमत ठरवली जाते. लीड अॅसिड बॅटरी स्वस्त असली तरी बॅटरीचे आयुष्य कमी असते. लिथियम आयर्न बॅटरीचे आयुष्य अधिक असले तरी किंमत जास्त असते. याची नोंद ग्राहकांनी घ्यावी.

चार्जिंग:

सरासरी युजर्सचा दररोज किती किलोमीटर प्रवास आहे, आणि चार्जिगसाठी किती वेळ लागतो, याचा अभ्यास करुन इलेक्ट्रीक बाईकची निवड करावी. वाहन निर्मिती कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देतात याचा विचार करुन गाडी निवडावी. त्यामुळे युजर्सचा प्रवास सुखकर होईल.

दुरुस्ती केंद्र:

आज घडीला इलेक्ट्रीक वाहनांचा संपुर्ण देशात विस्तार झालेला नाही. ग्रामीण आणि शहरी भागात इलेक्ट्रीक वाहनांचे दुरुस्ती केंद्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे जवळचे दुरुस्ती केंद्र कुठे आहे? सर्व्हिस कशा प्रकारे देतात याची चौकशी करावी. भविष्यात एखादी समस्या उद्धभवल्यास तात्काळ दुरुस्ती करुन मिळेल.

खरेदीचे पर्यायः

पारंपारिक पद्धती व्यतिरिक्त इलेक्ट्रीक वाहन खरेदीचे आधुनिक पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध आहे. विशिष्ट रक्कम भरुन ओटीटी प्लॉटफार्मवर काही चित्रपट पाहायला मिळतात, त्याप्रमाणे काही रक्कम भरुन इलेक्ट्रीक वाहन किरायाने मिळतात. काही ब्रँडेड कंपनी आपले इलेक्ट्रीक वाहन करार तत्वावर देत आहेत. करार संपल्यानंतर पुन्हा वाहन कंपनीकडे परत करावे लागते. या पर्यायाचा अवलंब ग्राहकांना करता येतो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News