वर्क फ्रॉम होम करतायं? थकलेल्या डोळ्यांना असा द्या आराम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 April 2020

आपल्या डोळ्यांना आवश्यक विश्रांती मिळत नाही आणि याचा परिणाम असा होतो की आपले डोळे एकदम थकून जातात. आपल्या थकलेल्या डोळ्यांना कसा आराम द्यायचा हे जाणून घेऊ

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. ज्यामुळे बहुतेक लोक घरातूनच काम करत आहेत. घरातून काम करण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला सलग अनेक तास डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा स्मार्टफोनची स्क्रीन पाहावी लागते. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना आवश्यक विश्रांती मिळत नाही आणि याचा परिणाम असा होतो की आपले डोळे एकदम थकून जातात. आपल्या थकलेल्या डोळ्यांना कसा आराम द्यायचा हे जाणून घेऊ

चमच्याचा वापर 

हा उपाय खूप सोपा आहे. फ्रीजरमध्ये स्टीलचा चमचा 15 मिनिटे किंवा गोठण्यापर्यंत ठेवा. थोड्या वेळाने बाहेर काढून डोळ्यावर थंड चमचा लावा. डोळ्यावर एक चमचा ठेवल्याने रक्तवाहिन्यांत आराम मिळतो आणि आसपासची सूज दूर होते.

थंड शेक

डोळ्यांच्या विश्रांतीसाठी थंड शेक खूप उपयुक्त आहे. यासाठी, आपण नॅपकिनमध्ये बर्फ ठेवून डोळ्यांना शेकवू शकता. यामुळे डोळे शांत होऊन त्यांना आराम मिळू शकतो. 

काकडी

काकडी डोळ्यांना आराम देण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. काकडी बारीक चिरून घ्या आणि डोळ्यांवर लावा. यामुळे केवळ थकलेल्या डोळ्यांनाच दिलासा मिळत नाही तर यामुळे डार्क सर्कल्सचा त्रासही दूर होईल.

टी-बॅग 

टी-बॅग गरम पाण्यात थोडा काळ बुडवा आणि नंतर ती थंड होऊ द्या. यानंतर टी-बॅग थोड्या काळासाठी फ्रीजरमध्ये ठेवा. थंड झाल्यावर थोडावेळ डोळ्यांवर लावा. चहामध्ये उपस्थित कॅफिन डोळ्यांभोवतीची सूज दूर करते.

मीठ कमी खाणे

जेवणात मिठाचा वापर कमी करावा, जास्त मीठ हे आरोग्यासाठी धोकादायक असते. यामुळे डोळ्यांना सूज येऊन पाणी येऊ शकते. 

याशिवाय सतत स्क्रीनकडे पाहणे त्रासदायक ठरू शकते. यासाठी कामातून ब्रेक घेऊन डोळ्यांना स्क्रीनपासून आराम देणे देखील तेवढंच आवश्यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News