थकव्याशी असा करा सामना...

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Monday, 25 March 2019

सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक जणांची थकव्याची तक्रार असते. शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या थकव्याला विविध कारणे असू शकतात. थकवा घालवून आयुष्यातील उत्साह परत आणण्यासाठी...

सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक जणांची थकव्याची तक्रार असते. शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या थकव्याला विविध कारणे असू शकतात. थकवा घालवून आयुष्यातील उत्साह परत आणण्यासाठी...
१. नियमित व्यायाम, चौरस आहार, पुरेशी विश्रांती, योग्य झोप ही निरामय आरोग्याची चतु:सूत्रीच आहे. आपल्या दैनंदिन जीवनात यापैकी कशाची कमतरता असल्यासही थकवा जाणवू शकतो.
२. दररोज पुरेसे पाणी पिणेही गरजेचे आहे. आता उन्हाळा सुरू होत असल्याने पाण्याचे प्रमाण हळूहळू वाढवत न्यावे.
३. अनेक जण प्रमाणापेक्षा अधिक चहा-कॉफीचे सेवन करतात. त्यामुळेही थकव्याला आमंत्रण मिळू शकते.
४. उन्हाळ्यात अनेक जण कृत्रिम शीतपेयांचे अधिक सेवन करतात. मात्र त्यांचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताक, लस्सी, लिंबू सरबर, ऊसाचा रस आदी नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्यावे.
५. काही व्यक्तींमध्ये बी १२ तसेच इतर जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झाल्यानेही थकवा जाणवतो. तसेच काही आजारांमध्येही थकवा हे लक्षण म्हणून जाणते. 
६. उन्हाळ्यात अनेक जण व्यायाम करणे टाळतात. मात्र व्यायाम कोणत्याही ऋतूत आवश्‍यक असतो. उन्हाळ्यात योगासने, चालण्यासारख्या हलक्‍या व्यायामांवर भर द्यावा.
७. पुरेशा उपाययोजनेनंतरही थकव्याची तक्रार कायम राहत असल्यास वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News