स्टायलिश लूकसाठी 'हे' करा.. 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 March 2019

आपण स्टायलिश दिसावं असं कोणाला नाही वाटतं? पण कधी कधी या स्टायलिश लूकच्या नादात आपल्याकडून काही चुका होतात. या चुका आपल्या लक्षात येत नाहीत; पण या चुका टाळल्या, तर तुम्ही नक्कीच स्टायलिश दिसाल.

हल्ली आकाराने मोठी दिसणारी घड्याळं किंवा डिजिटल घड्याळं तरुण मुलंच अधिक घालतात. तुम्हालाही स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही मोठं डायल असलेलं पण जाडीला कमी असलेलं स्लिम घड्याळ घातलं तरच छान दिसेल.

आपण कपडे कसे घालतो यावरही आपला स्टायलिश लूक अवलंबून असतो. तुम्ही कोणतेही कपडे परिधान करा, मग ते शर्ट असो वा टी-शर्ट. ते कधीच ढगळे किंवा सैल नसावेत. म्हणजेच ते खूप घट्ट आणि खूप सैल असे नसावेत. सैल टी-शर्ट हे प्रामुख्याने कॉलेजला जाणारे तरुण वापरतात. म्हणूनच शर्ट किंवा टी-शर्ट फिटिंगचे असावेत. 

पॅण्टलाही बुटाच्या वर घड्या पडत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. तसं होत असल्यास टेलरकडून कापून घ्यावे. पायाच्या घोट्याजवळ पॅण्ट घट्टच असायला हव्यात. पार्टीला जाण्यासाठी कोणते शूज घालावेत, हा नेहमीच पडलेला प्रश्‍न असतो. म्हणूनच फॉर्मल शूज, सेमि फॉर्मल शूज, लोफर्स किंवा स्नीकर्सचा वापर करावा; मात्र कधीही स्पोर्टस शूजचा वापर करू नये. 

अंगाने व्यवस्थित असलेल्या व्यक्तीनेच म्हणजेच व्यायामाने शरीर कमावलेल्या लोकांनीच हाफ स्लिव्हज शर्टचा विचार करावा. बारीक माणसांनी हाफ स्लिव्हज शर्ट घालणे टाळावेच. तसंच, हे हाफ सिल्व्हज शर्ट शक्‍यतो एकाच रंगांचे घालावेत. चेक्‍सचे किंवा रंगीत हाफ शर्ट केवळ पिकनिक मूडसाठी छान दिसतात. 

तुम्हाला चेक्‍सचे शर्ट घालणे आवडत असेल, तर त्यातही शक्‍यतो मोठमोठ्या आकाराचे, रंगीबेरंगी, चित्रविचित्र आकाराचे चेक्‍स घालणे टाळावे. बारीक चेक्‍स असलेल्या शर्टस्‌चा वापर अवश्‍य करावा. आजकाल बारीक डिझाईनचे शर्ट ‘इन’ आहेत. 

ब्लॅक, ग्रे, नेव्ही ब्लू आणि ब्राऊन हे रंग सदैव फॅशनमध्ये ‘इन’ असतात. गुलाबी, आकाशी हे रंग सगळ्यांनाच चांगले दिसतात असं नाही म्हणूनच तुम्हाला ऑफिसला किंवा कॉलेजला काय घालून जावं असा प्रश्‍न पडतो तेव्हा नेहमीच या ‘इन’ कलर्सनाच प्राधान्य द्यावं.

कधी कधी पैसे वाचवण्याच्या नादात आपण अतिशय हलक्‍या प्रतीचे कपडे खरेदी करतो. मात्र, तुम्ही महागडे पण कमी कपडे खरेदी केलेत तर ते अधिक दिवस टिकतात. म्हणूनच कपडे खरेदी करताना नेहमी या गोष्टीचे भान ठेवावे. 

कधी कधी तुम्ही गडद आणि फिक्‍या रंगांची रंगसंगती करताना दिसता; मात्र अशी रंगसंगती केवळ निळ्या रंगासोबतच चांगली दिसते. विशेषत: तुम्ही जेव्हा फिक्‍या रंगांचे शर्ट परिधान करता, तेव्हा त्याच रंगांची गडद पॅण्ट वापरण्याऐवजी त्याच्यासोबत नेहमीच काळ्या रंगाच्या पॅण्टला प्राधान्य द्यावं. कारण काळा रंग सगळ्या रंगांसोबत खुलून दिसतो. 

क्रॉक्‍स किंवा सॅंडल हे दोन प्रकार आहेत. ते आपल्याला आरामदायी वाटतात; मात्र ते फार काही छान दिसत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News