अशा रीतीने करा कर्करोगावर मात!

नेत्वा धुरी
Monday, 25 March 2019

शरीराचा अवयव काढणं हे प्रत्येकाला स्वीकारायला कठीण जातं. स्त्रीची मूळ ओळख तिच्या दिसण्यात असते. त्यातच उपचारांकरिता दोन्ही स्तन काढले जाताहेत, हे पचवणं तिला कठीण गेलं. पहिले सहा महिने कित्येक वेळ, तासन्‌तास ती आरशासमोर निपचित पडून राहायची. अखेर स्वतःच हिंमत करून तिने आरशासमोर उभी राहून स्वतःच्या शरीराचा सामना केला. काही काळाने स्वतःच शांत झाली. शेजारच्या फोटोफ्रेममधील दोन्ही मुलींचा चेहरा पाहिला. त्या क्षणापासून, ती आपण बरे होणार ही सकारात्मक उर्जा मनामध्ये तयार करा, असं ती प्रत्येकाला सांगतेय.

शरीराचा अवयव काढणं हे प्रत्येकाला स्वीकारायला कठीण जातं. स्त्रीची मूळ ओळख तिच्या दिसण्यात असते. त्यातच उपचारांकरिता दोन्ही स्तन काढले जाताहेत, हे पचवणं तिला कठीण गेलं. पहिले सहा महिने कित्येक वेळ, तासन्‌तास ती आरशासमोर निपचित पडून राहायची. अखेर स्वतःच हिंमत करून तिने आरशासमोर उभी राहून स्वतःच्या शरीराचा सामना केला. काही काळाने स्वतःच शांत झाली. शेजारच्या फोटोफ्रेममधील दोन्ही मुलींचा चेहरा पाहिला. त्या क्षणापासून, ती आपण बरे होणार ही सकारात्मक उर्जा मनामध्ये तयार करा, असं ती प्रत्येकाला सांगतेय.

ही कहाणी आहे शीव येथील कोळीवाड्यात राहणाऱ्या नमिता शिंदे (नाव बदललं आहे.) यांची. सरकारी नोकरीत ती चांगली रमली होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत तिनं  करिअरमध्येही चांगली झेप घेतली. रोजची शरीराची दुखणी सांभाळायला तिला वेळ नव्हता. छातीजवळ जडजड वाटलं की फिजिशियनने सांगितलेलं क्रीम लावत तिचा दिवसाचा क्रम सुरू होत होता. यातच तीन वर्ष गेली. छातीजवळ काहीतरी जाडा थर तयार झाल्याचं लक्षात आल्यानंतही छोट्या मुलीची दहावी असल्यानं याकडे दुर्लक्ष झालं.

एकेदिवशी मात्र दुखणं असह्य झाल्यानंतर रुग्णालय गाठलं. हा थर गाठीत तयार झालाय, टाटा रुग्णालयाच्या अहवालानंतर ही गाठ चक्क कॅन्सरची कळल्यानंतर घर-संसार, नोकरी-धंद्यात अडकलेली नमिता पूर्णपणे ढासळली. आपल्याला नेमका कोणत्या स्टेजचा स्तन कर्करोग आहे, हे ऐकण्यापूर्वीच आजाराचं नाव ऐकूनच ती बधीर झाली होती. आपण बाऊण्ड्रीलाईनवर असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. मुलांचा सांभाळ, घराच्या इतर जबाबदाऱ्यांची, नवरा आणि मुलींमध्ये वाटणी करून ती उपचारांसाठी तयार झाली. आपली मूळ ओळख आपण गमावून बसतोय, याची सल तिच्या मनात होती. शस्त्रक्रियेनंतर केवळ कापसांच्या साहाय्याने तयार केलेले खोटे स्तन लावताना तर तिला रडूच कोसळलं.

या टप्प्यावर आपण का आलो, आपल्यासोबतच असं का घडलं, असा प्रश्‍नांचा भडीमार तिच्या डोक्‍यात सुरू राहिला. केमोथेरपीचं दुखणं वेगळंच. मुली अभ्यास सांभाळून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताहेत, नवरा आर्थिक गणित जुळवतोय, यात तिचे विचारचक्र थांबेना. या सगळ्यांतून सुखरूप बाहेर पडताना आपली मूळ ओळख कायमची पुसली जाणार हे स्वीकारणं तिला कठीणंच होतं.

सहा महिन्यांच्या उपचारानंतर तिनं घराबाहेर पडायचं ठरवलं. नोकरीची वेळ झाली, आता जगाला सामोरं जायला हवं, हे तिनं निश्‍चित केलं खरं; पण सगळ्यांचा सामना कसा करायचा, या विचारांनी ती सैरभैर झाली. कपाटातले कपडे काढून फेकले... मनासारखा एकही कुर्ता नाही ना पंजाबी ड्रेस... साडीतही आपली लाज जाणार... काय झालंय, काय होऊन बसलंय, हा विचार तिला स्वस्थ बसू देईना. ती कित्येक तास आरशासमोर निपचित पडून राहिली. अश्रूंच्या धारा, आक्रोश या सर्वांतून शरारीतील ऊर्जा कायमची संपलीय...

या विचारानेच ती गारठली होती. सगळं काही संपलंय, असा समज पक्का करत ती आरशाजवळील वस्तू फेकणार तेवढ्यातच तिला आपल्या कुटुंबाची फोटोफ्रेम हाती लागली. क्षणातच सगळी नकारात्मक ऊर्जा संपली. जगण्याचं कारण मिळालं. मूळ ओळख गमावली तरीही नव्या ओळखीला जगाने स्वीकारलं नाही, तरीही कुटुंबानं स्वीकारलंय हेच पुरेसं आहे, अशी मनाशी गाठ बांधत ती उठली. नवे कपडे घालून तयार झाली. नोकरीत पुन्हा रुजू झाली. आज स्तन कर्करोग हा जीवघेणा असला तरीही त्याच्यावर उपचार घ्या, आपण बरे होणार ही सकारात्मक उर्जा मनामध्ये तयार करा, असं ती प्रत्येकाला सांगतेय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News