असे करा मुलांवर संस्कार

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Monday, 27 May 2019

मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे.

मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत नसतात; (पालकांच्या) वागण्यातून होत असतात.

मुलं ‘ऐकत’ नसली तरी पालक स्वतः कसे वागतात, हे ती ‘पाहत’ असतातच. म्हणजेच, ठरवून ‘केले’ नाही तरी मुलांवर संस्कार होतच असतात. त्यामुळे ते योग्य होत आहेत की नाही, हे तर पाहावंच लागतं. ‘पालक’ म्हणवणाऱ्याचं ते कर्तव्यच असतं. अर्थात हेही खरं की, आजच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात हे पाहणं अवघड झालंय. त्यातच टीव्ही, इंटरनेट, मोबाईल फोन हे सर्वच मुलांच्या भावविश्‍वात प्रचंड वेगानं उलथापालथ घडवीत आहे.

बदलत्या काळात मुलांवरील संस्कार ही एक अवघड बाब बनून बसली आहे. हे सगळं असलं तरी मुलांवरील संस्काराचं महत्त्व कमी झालेलं नाही. किंबहुना ते वाढलंच आहे. चहूबाजूंनी होत असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांना समर्थपणे पेलण्यासाठी त्यातही स्वतःचं वेगळेपण, माणूसपण जपण्यासाठी मुलांचं मन, मेंदू, बुद्धी सारंच सशक्त हवं. दृढ, सखोल, सुयोग्य संस्कारांची आज कधी नव्हे, इतकी मोठी गरज आहे. आजच्या ‘इन्स्टंट’च्या जमान्यात, सारं काही झटपट मिळवण्याच्या मोहातून मुलांना वाचवू शकतील ते उत्तम संस्कारच.

संस्कार केले जातात म्हणूनच माणसाच्या मुलाला ‘माणूस’ म्हणता येतं. अन्यथा ते प्राणी पातळीवरच राहिलं असतं. हिंदू संस्कृतीमध्ये तर माणसाच्या जन्मापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत सोळा संस्कार सांगितले आहेत. तसे हे सर्व ‘व्यवहार’च असतात, तरीही आपल्या द्रष्ट्या कवींनी सुंदर मंत्र रचून त्यांचे संस्कार समारंभ केले. जीवनातल्या प्रत्येक उपयुक्त कृतीला सुंदरतेनं नटवावं, ही रवींद्रनाथांचीही कल्पना होती. माणूस सुसंस्कृत कधी होतो? संस्कृतीच्या कल्पनेतच मुळी सौंदर्यकल्पनेचा अंतर्भाव आहे. सौंदर्याचा अनुभव घेण्याचं सामर्थ्य वाढवणं आणि जीवनातली अंतर्बाह्य कुरूपता नाहीशी करणं हेच तर शिक्षणाचं, संस्कारांचं उद्दिष्ट असतं...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News