हिवाळ्यात थंडीकडे दुर्लक्ष करू नका, हृदयविकाराचा त्रासही होऊ शकतो

यिनबझ टीम
Wednesday, 20 November 2019

जर आपल्याला थंडीच्या दिवसात श्वास घेण्यात त्रास होत असेल, छातीत दुखत असेल किंवा थरथर कापत असेल तर ही हृदय विकार किंवा रक्त वाहिन्यासंबंधीच्या त्रासांसंबंधीची लक्षणे देखील असू शकतात. फ्लूसारख्या समस्या म्हणजेच विषाणूजन्य ताप हा हवामानात वेगाने होणाऱ्या बदलामुळे पसरतो. त्यामुळे या दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे.

थंडी, सर्दी आणि खोकला हिवाळ्यात सामान्य आहे. बरेच लोक केवळ घरीच उपचार करून काम चालवतात.  कधीकधी हा फ्लू लवकर बरा होतो, परंतु काहीवेळा हा आजार खूप दिवस टिकून राहातो. जर आपल्याला श्वास घेण्यात त्रास होत असेल, छातीत दुखत असेल किंवा अंग थरथर कापत असेल तर ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी लक्षणे देखील असू शकतात.

कार्डियोमायोपॅथी म्हणजे काय?
कार्डिओमायोपॅथी हा एक आजार आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे शरीरात रक्त पंप करण्यात अडचण येते. कार्डिओमायोपॅथीमध्ये, स्नायू विस्तृत होतात आणि संकुचित होतात.  यूकेच्या डॉक्टरांनीही याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की थंडीच्या दिवसात फ्लू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी देखील होऊ शकतो, म्हणूनच लोकांना या लक्षणांबद्दल जागरूक केले पाहिजे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News