फ्लॉप चित्रपट असा करा सुपरहिट

सिद्ध चुळवंत
Tuesday, 4 June 2019

हॉलमध्ये पिन ड्रॉप शांतता होती म्हणून हा संवाद किमान वीस पंचवीस लोकांना ऐकू गेला, पैकी पंधरा एक लोकांनी आमच्याकडे वळून पाहिलं. असं कसं करतात हे  मधली दोन रीळ नाही दाखवले जवळपास. खरं दहा बारा लोक थांबून आमच्याकडे पाहू लागले.

मी व माझा मित्र मुक्या कॉलेजला असताना एकदा पिक्चरला गेलेलो. तो सिनेमा भयंकर भंगार निघाला. तरीही गप्पा मारत मारत आम्ही शेवटपर्यंत तो पाहिला. शेवट झाल्यावर हॉलमधील लाईट्स लागले आणि प्रेक्षक जांभया देत बाहेर पडू लागले. आम्हा दोघांना खोडी करायची इच्छा झाली. मी मुक्याच्या कानांत पुटपुटलो, तो हसला लोक आमच्या आजूबाजूने जाऊ लागले. आम्ही उभे राहिलो. लगेच आमचा संवाद सुरु झाला. मी म्हणालो. अरे ! असा कसा संपला राव पिक्चर ? होना रे पिक्चर अर्धवटच दाखवलाय. 

हॉलमध्ये पिन ड्रॉप शांतता होती म्हणून हा संवाद किमान वीस पंचवीस लोकांना ऐकू गेला, पैकी पंधरा एक लोकांनी आमच्याकडे वळून पाहिलं. असं कसं करतात हे  मधली दोन रीळ नाही दाखवले जवळपास. खरं दहा बारा लोक थांबून आमच्याकडे पाहू लागले. अरे मी पाहिलाय आधी म्हणून सांगतोय. काय होतं त्यात? अरे असली मसाला त्यातच तर होता. चल पळ त्या ऑपरेटर च्या खिडकीकडे, त्याला भांडून दाखवायला सांगू. आम्ही लगबगीने हॉलमधील त्या ऑपरेटरच्या खिडकीकडे निघालो. जाता जाता वळून पाहिलं तर सात आठ प्रेक्षक थांबले होते. आम्ही खिडकीकडे जाऊन ऑपरेटरशी खोटा संवाद साधण्याचे नाटक केले व लगेच परत बाहेर पडण्यासाठीच्या दाराकडे निघालो. तिथे पायरीवर पाच प्रेक्षक आमची वाट पाहत उभे होते. पैकी एक म्हणाला. काय मनाला ओ त्यो तो म्हणाला कुणाला सांगू नका, पुढच्या शो ची तिकिटं देतो. तिकीट खिडकीवरची लाईन संपेपर्यंत थांबा व शेवटी तिथे या, काय काटलय काय पन त्या कडूच्यानं?

अरे डाकूंच्या अड्ड्यावरचं गरमागरम गाणंच ढापलं त्यानं, सोडतो काय त्याला ! चल मुक्या, अर्धा तास वेळ आहे, तोपर्यंत चहा मारून येऊ निवांत. आम्ही तिथून निघालो तेंव्हा ते पाचजण बुचकळ्यात पडले होते. पंधरा वीस मिनिटांनी आम्ही परत लपून थेटरच्या तिकीट खिडकीकडे जाऊन पाहिलं तर तिथे नंतरच्या शोसाठी लोकांची लाईन लागलेली व बाजूला त्या शेवटच्या पाच पैकी तिघाजणांच्या नजरा वैतागलेल्या अवस्थेत आमचा शोध घेत होत्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News