'तुम्ही घाबरू नका, मी पवार साहेबांच्या कानावर घालतो'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 March 2020

मंत्री जयंत पाटील यांच्या 'त्या' फोन कॉलमुळे घाबरलेल्या पर्यटकांना आला धीर

मुंबई: पर्यटनासाठी उज़्बेकिस्तान देशामध्ये महाराष्ट्रातील 39 नागरिक गेले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावा टाळण्यासाठी   उज़्बेकिस्तान- भारत विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे 39 नागरिक ताशकंद शहरात अडकुन पडले आहे. मायदेशी परतण्याची शक्यता दिसत नसल्याने घाबरुन गेलेल्या पर्यटकांनी थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना उज़्बेकिस्तान येथून व्हिडीओ कॉल केला. 'तुम्ही घाबरू नका, मी पवार साहेबांच्या कानावर घालतो' जयंत पाटील यांचे हे शब्द ऐकून पर्यटकांना मोठा धीर आला.

सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. जगभरातील नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. अशातच महाराष्ट्रातील जवळपास 39 नागरिक विमानसेवा नसल्याने उज़्बेकिस्तानच्या ताशकंद शहरात अडकले आहेत. १० मार्च रोजी हे पर्यटक भारतातून उज़्बेकिस्तानला गेले होते. सोमवारी (ता.१६) हे पर्यटक मायदेशी परतणार होते मात्र ऐनवेळी त्यांना विमानसेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

घाबरलेल्या पर्यटकांनी मंत्री जयंत पाटील यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. तुम्हाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वच प्रयत्न केले जातील. तसेच शरद पवार साहेबांकडे तुम्हाला परत आणण्यासाठी केंद्राकडे शब्द टाकण्यासाठी विनंती करेल असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी पर्यटकांना दिले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News