हिना खान सारखा नॅचरलमेकअप करण्यासाठी 'हे' करा 

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 30 January 2020
  • सर्वांना मेकअप आवडतो, परंतु त्याच वेळी मेकअप असा असावा की, आपण भेटत असलेल्या लोकांना आपण किती हेवी मेकअप केला आहे हे समजले नाही पाहिजे.
  • नॅचरल मेकअप लुक मिळविण्यासाठी तो योग्यरित्या करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - सर्वांना मेकअप आवडतो, परंतु त्याच वेळी मेकअप असा असावा की, आपण भेटत असलेल्या लोकांना आपण किती हेवी मेकअप केला आहे हे समजले नाही पाहिजे. नॅचरल मेकअप लुक मिळविण्यासाठी तो योग्यरित्या करणे आवश्यक आहे. आम्ही अलीकडेच अभिनेत्री हिना खानचा मेकअप लूक पाहिला, ज्यामध्ये तिचा चेहरा केवळ नॅचरल दिसत नाही तर एकदम फ्रेशही दिसत आहे. 

1. आपला चेहरा धुल्यानंतर त्वचेनुसार मॉइश्चरायझर लावा. जर आपली त्वचा चांगली मॉइस्चराइझ असेल तर मेकअप कधीही असमान किंवा कैकीसारखा दिसणार नाही. 

2. नॅचरल लूकसाठी जेल किंवा क्रिम पेक्षा चांगले पावडर फाउंडेशन असते. जेथे गरज असेल तेथे फाउंडेशन लावा आणि चांगले ब्लेंड करा. ते जास्त लावू नका.

3. डार्क सर्कल्साठी, हाईलाइटिंग कनसीलरचा वापर करा. फाउंडेशन प्रमाणेच फक्त आवश्यक ठिकाणी लावा. नैचुरल लुकसाठी याला स्पंज किंवा फिर ब्रशच्या साहाय्याने ब्लेंड करा.   

4. जर तुम्हाला नॅचरल लुक पाहिजे असेल तर कॉनट्ररिंग करू नका आणि नॅचरल ब्लश करा. ब्लशला गालांवर लावा, यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसते.

5. डोळ्यांना हाइलाइट करायला विसरू नका. आइशैडोच्या व्यतिरिक्त तुम्ही काजळ आणि मसकारा देखील लावू शकतात. 

6. शेवटी तुमच्या स्किन टोनच्या हिशोबाने लाईट पिंक, न्यूड शेड किंवा तुमच्या कपड्याला मैचिंग लिप्सटिक लावा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News