शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचतात का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • ज्या ठिकाणी प्रशासन योग्य अंमलबजावणी करतो त्या भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना पोहतात, मात्र अनेक वेळा तळागाळातील गरीबांपर्यात शासकीय योजना पोहत नाहीत.

मुंबई : सरकार जनतेच्या सर्वांगीन विकासाठी विविध योजना तयार करते. योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचलते. योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे. ज्या ठिकाणी प्रशासन योग्य अंमलबजावणी करतो त्या भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना पोहतात, मात्र अनेक वेळा तळागाळातील गरीबांपर्यात शासकीय योजना पोहत नाहीत. केंद्र सरकारने एक रुपया जनतेसाठी दिला तर २५ पैसे लाभारत्यांपर्यत पोहचतात असे मत माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी व्यक्त केले होते. अद्यापही फारशी परिस्थिती बदलली नाही. 'शासनाने आलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचतात का? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

शासन स्तरावर जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. ज्यामध्ये  रस्ते, पाणी, आरोग्य, शेती, असे अनेक योजना असतात. प्रत्येक जिल्हा  व तालुका स्तरावर वित्तीय बजेट ठरवलेला असतो. बऱ्याच वेळेस असे होते की, शासनाने राबविलेल्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाहीत. ग्रामीण स्तरावर ज्या काही योजना शासनाकडून येतात मग ते घरकुल असो, रस्ता असो किंवा अन्य काही ह्या सर्व योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. पण असे होत नाही. असे बरेच अधिकारी आहेत जे लाच घेतल्याशिवाय जनतेची कामे करत नाहीत. शासनाच्या नियमाचं पाहिजे तस पालन होत नाही. आणि याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो. शासनाने सर्व अधिकारी वर्गावर कडक नियंत्रण ठेवले पाहिजे.
- कृष्णा गाडेकर

शासनाने राबविलेल्या योजना काही योजना प्रभावी पणे जनतेपर्यंत पोहचत आहेत जसे की प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, उज्वला योजना ज्याद्वारे मोफत LPG connection देण्यात आले, आधार आज प्रत्येक घरी शौचालय आहे. सध्या covid 19 pandemic चालू असताना प्रत्येकाला मोफत तांदूळ आणि डाळीची योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नवीन रस्त्याचे काम चालू आहे.
- प्रतिक भालेराव

मला वाटते ८० टक्के योजना जनतेपर्यंत पोहचतात कारण प्रशासकीय व्यवस्था आतुन पुर्ण पणे पोखरली गेली. तीला व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी शासनाबरोबर  नागरीकांना देखील जागृत होणे महत्वाचे आहे. पण एखादा व्यक्ती जर प्रशासकीय व्यवस्थेचा विरोधात जातो मग त्याला नाहक त्रास भोगावा लागतो. त्यासाठी युवकांच संघठन हे फार महत्वाच आहे.
- अमरजितसिंह राजपूत

एखादी व्यक्ती सहसा प्रशासकीय विरोधात जाऊ शकत नाही हे मान्य आहे मला, त्यासाठी तर आपण आपले आमदार, खासदार कायदेमंडळात आणि कार्यकारी मंडळात पाठवतो, तुम्ही त्यांच्यामार्फत तुमचे प्रश्न मांडू शकता? तुमच्या प्रश्नाचे निवारण करू शकता, प्रत्येक वेळेस प्रशासनाला दोष देणे चुकीचे आहे.
- अंजिक्य भालेराव

शासनाने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत आहे पण या योजनांचा सर्वाधिक लाभ त्या व्यक्तींना मिळतो, ज्यांची ओळख अधिकाऱ्यापर्यंत असते... प्रधानमंञी आवास योजना पहा... अधिकारी यांच्याशी बोलुन एकाच कुटुंबातील दोन, तीन व्यक्ती लाभ घेत आहेत...
- आकाश जाधव
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News