लग्नासाठी मुलांच वय 21 आणि मुलींचं वय 18 वर्ष असणे गरजेचं आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 27 August 2019

1978 साली देशात एक कायदा करण्यात आला, ज्यामध्ये नमुद करण्यात आलं की लग्नाच्या किंवा लग्न संबंधाच्यावेळी मुलाचं वय 21 वर्ष पुर्ण आणि मुलीचं वय 18 वर्ष पुर्ण असणे बंधणकारक आहे.

1978 साली देशात एक कायदा करण्यात आला, ज्यामध्ये नमुद करण्यात आलं की लग्नाच्या किंवा लग्न संबंधाच्यावेळी मुलाचं वय 21 वर्ष पुर्ण आणि मुलीचं वय 18 वर्ष पुर्ण असणे बंधणकारक आहे. याआधी म्हणजेच 1927 साली मुलाचं वय 18 आणि मुलीचं वय 14 अशी अट होती; पण एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार 1889 साली 11 वर्षीय फुलमोनी दासीसोबत 35 वर्षांच्या त्यांच्या पतीने लग्न संबंध ठेवल्यानंतर फुलमोनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या वयोमानाच्या अटीमध्ये बदल करण्यात आले.

लग्नाच्या बाबतीत केंद्रस्थानी असलेल्या मुलीची शारिरीक परिस्थित विचारात घेऊन लग्नासाठी 18 वयाची अट केली, असं काही सामाजिक कार्यकर्त्यांच  मत आहे. बिहारमधील एका गावातल्या नागरिकांच्या मते मुलीचं वय जर मुलाच्या वयापेक्षा जास्त असलं तर मुली कणखर बनतात आणि मुलाच्या नियंत्रणात राहात नाहीत, त्यामुळे मुलाचं वय नेहमीच मुलीच्या वयापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे.

लग्नासाठी मुलामुलींच्या वयावर असलेल्या वादाला कोणत्याच कायद्याचा आधार नसल्याचं समोर येत आहे, मात्र भारतीय कायदा 1875 नुसार मुलामुलींना 18 वर्षानंतर प्रौढ मानलं जातं, म्हणजेच वयाच्या 18 वर्षानंतर मुलं आणि मुली समान वयामध्येदेखील लग्न करू शकतात.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेल्या आवाजानुसार 18 व्या वर्षी लग्न होणे म्हणजे मुलीकडे आईची जबाबदारी तसेच इतर अनेक जबाबदाऱ्या येतात, त्यामुळे लग्नासाठी किंवा लग्नसंबंधासाठी मुलींचं वय 18 आणि मुलाचं वय 21 असणे हा मुद्दा अजूनही वादात असल्याचे समजते आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News