CAA विरोधात आंदोलन करा, पैसे मिळवा; कंपनीकडून तरुणाला ऑफर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • केरळमध्ये वास्तव्यास असलेल्या २३ वर्षीय अब्दुल्ला या तरुणाने दुबईमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता.
  • अब्दुल्ला याचे मॅकेनिकल इंजिनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण झाले असून संबंधित पदासाठी त्याने अर्ज केला होता.

दुबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात CAA  आणि NRC विरोधात प्रचंड प्रमाणात रोष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या बाहेरील देशांत देखील होताना दिसत आहे. दुबईत नोकरीसाठी गेलेल्या तरुणाला चक्क CAA विरोधात आंदोलन केल्यास जास्त पैसे मिळतील असं सांगण्यात आलं  आहे. 

केरळमध्ये वास्तव्यास असलेल्या २३ वर्षीय अब्दुल्ला या तरुणाने दुबईमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. अब्दुल्ला याचे मॅकेनिकल इंजिनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण झाले असून संबंधित पदासाठी त्याने अर्ज केला होता. मात्र कंपनीचं उत्तर ऐकून तरुणाला देखील धक्का बसला आहे. दुबईत गेल्या दीड महिन्यांपासून CAA विरोधात आंदोलन सुरु आहे. या तरुणाला कंपनीने याबाबत सविस्तर मेल केला आहे. 

दुबईच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला याने ज्या कंपनीत ईमेलद्वारे अर्ज केला त्या मेलला तिथून रिप्लाय आला. या मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे की, आम्ही विचार करतोय, तुम्हाला नोकरीची काय गरज? दिल्लीतील शाहिनबाग येथे CAA विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा. त्यासाठी तुम्हाला दरदिवशी एक हजार रुपये मिळतील. याशिवाय मोफत जेवण आणि गोड पदार्थ देखील  मिळतील. अर्जाचा असा रिप्लाय पाहून तरुणाला देखील धक्का बसला आहे. कंपनीकडून आलेला हा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर संबंधित कंपनी आणि व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

दरम्यान गेल्या काही महिन्यापासून CAA  विरोधात देशातील वातावरण मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. बॉलिवूडकरांनी देखील यामध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. याशिवाय काही राजकीय पक्षांकडून CAA च्या समर्थनार्थ मोर्चा देखील काढण्यात येत आहे. संपूर्ण देशात या कायद्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यातच अशापद्धतीने नोकरीसाठी अर्ज केलेल्या तरुणाला रिप्लाय देणं कितपत योग्य आहे? अशापद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News