आदर्श आईबाबा होण्यासाठी हे करा!

सुवर्णा पाटणे- बोंगाळे
Monday, 8 April 2019

मैत्रिणींनो आज आपण आई- बाबा अन्‌ मूल या त्रिकोणाचा विचार करणार आहोत. मूल पाच- सहा वर्षांचं होतं तेव्हा त्याला सगळ्या घडामोडींची जाणीव होते. याच वयात ते आपली सुरक्षितता शोधायचा प्रयत्न करीत असतं. अन्‌ या त्याच्या शोधाला योग्य दिशा आपणच द्यायची असते. 

मैत्रिणींनो आज आपण आई- बाबा अन्‌ मूल या त्रिकोणाचा विचार करणार आहोत. मूल पाच- सहा वर्षांचं होतं तेव्हा त्याला सगळ्या घडामोडींची जाणीव होते. याच वयात ते आपली सुरक्षितता शोधायचा प्रयत्न करीत असतं. अन्‌ या त्याच्या शोधाला योग्य दिशा आपणच द्यायची असते. 

पालकांनी मुलाचा विचार डोळ्यांसमोर ठेवून वागणे फार गरजेचे असते. मुलांसमोर नको ते शब्द, भांडण- तंटा या गोष्टी होऊ देऊ नका. त्यामुळे मूल भावनिकरीत्या कोलमडून जाते अन्‌ त्यातून बाहेर पडणं फार अवघड होतं. मुलांकडे आपल्या कामामुळे दुर्लक्ष करू नये. उगाचच जुन्या- नव्या सवयींचा आढावा घेत बसू नका. इतर मुलांसोबत तुलना करू नका. 

आपल्या लहानपणाचा पाढा त्यांच्यासमोर वाचू नका. आमच्यावेळी असं होतं! आता तसं नाही! ही वाक्‍य मुलांचा आत्मविश्‍वास कमजोर करतात. आई- बाबा सतत कामातच असले तर निदान आठवड्यातून एक दिवस मुलांसाठी नक्की ठेवा. तो त्या एक दिवसाच्या सर्व भावना पुढचा पूर्ण आठवडा जपून ठेवतं. कारण त्याला आज दिवसभर त्याचे आई-बाबा मिळाले. 

ही मुलांची मानसिकता अन्‌ गरजही आहे हे विसरून चालणार नाही. मुलांच्या आजारपणात तुम्ही नक्की मुलाबरोबर असायलाच हवे. त्यामुळे मूल विश्‍वासी व तुमच्याविषयी नक्कीच आशावादी ठरेल. मुलांना सतत सूचना न केलेल्याच बरे.

मुलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मूल पालक- शिक्षक, वडीलधाऱ्या माणसांचे अनुकरण करत असते. म्हणूनच त्यांची योग्य ती जपणूक ही आपली जबाबदारी आहे हे नक्कीच जाणून घ्या. 

‘‘ऐहिक सुखाची प्राप्ती करून देण्यापेक्षा मुलांना ज्ञानाची कवाडे उघडी करून त्यांना भरारी घेऊ द्या.’’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News