असे करावे विश्वमित्रासन

मनाली देव, योग प्रशिक्षक
Tuesday, 10 September 2019
  • त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आसन करावे. मात्र, झटका, अतिताण देऊन ते करू नये.

या आसनाला विश्‍वामित्र ऋषींचे नाव दिले आहे. हे तोलात्मक आसन असून, योग्य मार्गदर्शन व योग्य सरावाने ते जमू लागते. यापूर्वी आपण वसिष्ठासनाचे व स्ट्रेचिंगचे विविध प्रकार पाहिले आहेत. त्याचप्रमाणे उत्थित परिघासन कसे करायचे हेही पाहिले आहे. हे सर्व व्यवस्थित जमू लागले की या आसनाचा सराव करणे योग्य राहील. प्रथम सूर्यनमस्काराच्या क्रमांक चारच्या स्थितीत, म्हणजेच हस्तपादासनामध्ये यावे.

त्यानंतर, डावा पाय डाव्या बाजूने पुढे घ्यावा. तो गुडघ्यात वाकवावा. डाव्या हातावर जोर देत शरीर डाव्या बाजूला वळवावे. त्यानंतर उजवा हात डोक्याच्या दिशेने घेऊन उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा किंवा पायाचा अंगठा पकडावा. हळूहळू पाय जमिनीपासून वर उचलून गुडघ्यात ताठ करावा. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा. शक्य तितका वेळ आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.

आसन सोडताना सावकाश उलटक्रमाने सोडावे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आसन करावे. मात्र, झटका, अतिताण देऊन ते करू नये. या आसनाच्या सरावाने हाताची ताकद तसेच लवचिकताही वाढते. रक्तप्रवाहही सुधारतो. हे स्पर्धात्मक आसन आहे
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News