बारावीच्या परीक्षेत दिव्यांशीला मिळाले १०० टक्के; वाचा यशाची कहानी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

दिव्यांशी जैन या विद्यार्थिनीने प्रत्येक विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून यंदा नवा इतिहास रचला.

लखौन : मनात इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. लखनौच्या दिव्यांशी जैन या १८ वर्षीय तरुणीने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के मार्क मिळवले आहे. आकाशाला गवसनी घालण्याचे नैत्रदीप काम विद्यार्थिनीने केले. दिव्याशीने मिळलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून सुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाला अखेर सोमवारी (ता.13) जाहीर झाला. दिव्यांशी जैन या विद्यार्थिनीने प्रत्येक विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून यंदा नवा इतिहास रचला. दिव्याशीला दहावीत ९७.६ टक्के मिळाले होते. दिवसेंदिवस दिव्यंशीच प्रगती पु्स्तक गुणांकणात वाढत आहे. त्याबंद्दल तिने आनंद व्यक्त केला. दिव्यंशीचे बाबा राकेश जैन व्यवसाईत आहेत. त्यांच लखौन शहरात दुकाण आहे. आणि गृहिनी आहे. दिव्यंशीने आपल्या यशाचे श्रेय आई- वडीलांना दिले आहे.

बारावीत मला सर्व विषयात १०० टक्के मार्क पडतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र बारावीच शैक्षणिक वर्ष सुरु झाले तेव्हापासून नियोजन बद्ध अभ्यास केला. अभ्यासक्रम, पाठ, प्रश्न पत्रिका समजून घेतल्या, त्यानुसार अभ्यासला सुरुवात केली. अधिकाधिक स्व-अध्यायन आणि प्रश्न पत्रिका सोडवण्यावर भर दिला. त्यामुळे परीक्षेत वेळेचे नियोजन करता आले' अशी भावना दिव्यांशीने व्यक्त केली.

वाचा: कोणत्या विषयात किती मिळाले गुण

इंग्रजी :       १०० मार्क
संस्कृत        १०० मार्क
भुगोल         १०० मार्क
इतिहास :    १०० मार्क
अर्थशास्त्र :  १०० मार्क
इश्योरन्स :  १०० मार्क
एकुण     :   ६०० मार्क
 
येथे पाहा सीबीएसई बोर्डाचा निकाल: cbseresults.nic.in आणि cbse.nic.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News