एका महिन्यात 72 लाख 27 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020

राज्यात आतापर्यंत सुमारे 20 लाख 41 हजार 2 क्विंटल गहू, 15 लाख 68 हजार 159 क्विंटल तांदूळ; तर 21 हजार 748 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. 1 मे ते 29 मेपर्यंत राज्यातील एक कोटी 50 लाख 12 हजार 175 शिधापत्रिकाधारकांना 72 लाख 27 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 31 लाख 66 हजार 773 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

राज्यात आतापर्यंत सुमारे 20 लाख 41 हजार 2 क्विंटल गहू, 15 लाख 68 हजार 159 क्विंटल तांदूळ; तर 21 हजार 748 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे चार लाख 29 हजार 577 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत, त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे; तर 4 मेपासून एकूण एक कोटी 25 लाख 74 हजार 180 रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील पाच कोटी 66 लाख 53 हजार 978 लोकसंख्येला 28 लाख 32 हजार 700 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News